रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Seema Deo Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 24, 2023 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Seema Deo Died

सीमा देव यांचे निधन

Seema Deo Passes Away : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. मुंबईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. त्यांची अल्झायमर आजाराशी सुरु असणारी झुंज आज अयशस्वी ठरली. वांद्रे येथील घरी आज बरीच मंडळी सीमा देव यांच्या अंतिम दर्शनासाठी पोचली आहेत.

सीमा देव व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव या जोडप्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

आणखी वाचा – केळीच्या पानांची सजावट, फुलांनी सजवला स्टेज अन्…; असं पार पडलं सिद्धार्थ चांदेकरच्या आईचं लग्न, फोटो व्हायरल

सीमा व रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देवनेही एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या कामाचंही सर्वत्र कौतुक होताना दिसलं. २०२०मध्येच सीमा यांन अल्झायमर या आजाराने गाठलं. दरम्यान अजिंक्यने एक ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती. आईच्या प्रकृतिविषयी त्याने सांगितलं होतं. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. कधीही बरा न होणाऱ्या या आजाराशी सीमा देव झुंज देत होत्या.

My mother Shrimati. Seema Deo doyen of marathi film industry is suffering from Alzheimer’s we the entire Deo family have been praying for her well being wish whole of Maharashtra who loved her so much also pray for her well being ????@mataonline @lokmanthannews @LoksattaLive

— Ajinkya Deo (@Ajinkyad) October 14, 2020

अजिंक्यने त्यांच्या आजाराविषयी सांगताना म्हटलं होतं की, “माझी आई अल्झायमर या आजाराने त्रस्त आहे. संपूर्ण देव कुटुंबीय तिच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत”. तसेच सीमा देव यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना करण्याची विनंती अजिंक्यने त्यावेळी केली होती.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressseema deo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Prakash Raj Tweet on Chandrayaan-3 Mission

चांद्रयान मोहिमेवर टीकात्मक पोस्ट, नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगनंतर प्रकाश राज यांचं नवं ट्विट, इस्त्रोचं अभिनंदन केलं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.