बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान लवकरच त्याचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. ‘पठाण’ला मिळालेल्या जोरदार यशानंतर शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्साहित झाले आहेत. चित्रपटाचे टिझर व गाणी आल्यानंतर पुढील आठवड्यात ट्रेलर प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. एकीकडे शारुखच्या चित्रपटाची चर्चा सुरु असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. शाहरुखच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळाले खरे, मात्र त्यात ७ बदल करण्याचे बोर्डाकडून सुचवण्यात आले आहे. (Jawan Movie)
शाहरुखच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘U/A’ दिला आहे. पण, चित्रपटात ७ आक्षेपार्ह सीन्समध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. यामुळे चित्रपटाचा स्क्रीनटाइम १६९.१८ मिनिटांपर्यंत म्हणजेच २ तास ४० मिनिटे १९ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ज्यात डोके नसलेल्या मृतदेहाचे दृश्य काढून टाकण्यात आलेले आहे. तर आत्महत्येच्या दृश्याची वेळदेखील कमी करण्यात आली आहे. शिवाय, चित्रपटात ज्यात ‘NSG’ चा उल्लेख काढून टाकणे, ‘राष्ट्रपती’चा उल्लेख ‘राज्यप्रमुख’ असा करणे व यांसारखे काही संवाद बदलण्याचे बोर्डाने सुचवले आहे.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात सुचवले ‘हे’ ७ बदल
- चित्रपटात आत्महत्येच्या दृश्याचा कालावधी कमी करावा.
- डोके नसलेल्या मृतदेहाचे दृश्य काढून टाकावा.
- चित्रपटातील आवश्यक नसलेल्या संवादात ‘राष्ट्रपती’ हा शब्द काढून त्याऐवजी ‘राज्यप्रमुख’ असा उल्लेख करावा.
- ‘पैदा होके’ संवादात बदल करून त्याऐवजी ‘तब तक बेटा वोट डालना…’ असं वापरावे.
- ‘उंगली करना’ ऐवजी संवादात ‘उससे यूज करो’ असे वापरण्यास सांगितले आहे.
- ‘बिकॉज फॉरेन लॅग्वेंज आहे’ आणि ‘एक्सपर्ट ट्रेनर्स फ्रॉम माय कंपनी’ हे संवाद बदलण्याचे सुचवले आहेत.
- चित्रपटात ‘NSG’ ऐवजी ‘IISG’ असा शब्द वापरावा.
हे देखील वाचा – “छोटीशी भूमिका तरीही…”, ‘ताली’मध्ये केलेल्या कामाबाबत रवी जाधव यांच्याकडून हेमांगी कवीचं कौतुक, म्हणाले, “तिने ज्या प्रकारे…”
अटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेथुपथी, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, गिरीजा ओक-गोडबोले आदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोणही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी तीन भाषांमध्ये देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Jawan Movie)