बॉलिवूड अभिनेता सलमान खानची चाहत्यांमध्ये खूप क्रेज आहे. सलमानचे चाहते त्यांच्यासाठी वेडे असलेले पाहायला मिळतात. एखादवेळेस सलमानचा एखादा चित्रपट चालला नाही तरीही त्याची प्रेक्षकांमधील क्रेज काही कमी होतं नाही. आता एका नव्या चर्चेत सलमान खान आला आहे. ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खानसोबत छोटी भूमिका साकारणाऱ्या सलमान खानची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगवली आहे. कारण एका नव्या लूकमध्ये तो दिसला. (Salman Khan New Look)
या त्याच्या नव्या लुककडे पाहून चाहत्यांना असं वाटतंय की, सलमान ‘तेरे नाम २’ चित्रपटाच्या त्याच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. सलमान खान नुकताच एका पार्टीत सहभागी होताना दिसला. मात्र या पार्टीतील त्याच मुख्य आकर्षण म्हणजे त्याने केस कापले असून टक्कल केलं आहे. त्याच्या या नव्या लूकनंतर ट्विटर हँडलवरून २०११ सालापासून एक ट्विट व्हायरल झालं होतं, ते ट्विट आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यांत त्याने म्हटलं होतं की, “मी देखील टक्कल करण्याचा विचार करत आहे”.
भाईजानचे हे फोटो विरल भयानी या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. यात त्याचा नवा लूक पाहायला मिळत असून त्यात तिने केस खूपच बारीक केले आहेत. चाहत्यांनी त्याच्या या लूकला ‘गजनी लूक’ असं म्हटलं आहे. सलमानचा हा डॅशिंग लूक पाहून चाहत्यांना २० वर्षांपूर्वीच्या भाईजानची आठवण झाली आहे. त्याचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करत ‘गजनी २’ वा ‘तेरे नाम २’ चित्रपटाची तयारी करत आहेस का, असा सवाल केला आहे.

दरम्यान, बऱ्याच चाहत्यांनी त्याचा हा नवा लूक पाहून तो शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं बोललं जात आहे. सलमान खानच्या नव्या लुकला घेऊन साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे की, नेमका हा सलमानचा नवा लूक कोणती नवी खुशखबर देणार.