बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्र “OMG २” रिलीजपूर्वीच विशेष चर्चेत आहे.सध्या लागोपाठ अक्षयकुमारने दिलेल्या फ्लॉप चित्रपटांमुळे “OMG २” साठी अक्षयने कमी मानधन आकारले यांसारख्या चर्चांना देखील मध्यंतरी उधाण आले होते. “OMG ” चा पहिला भाग पाहता दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना जास्त अपेक्षा आहेत. (‘OMG 2’ special screening)
“OMG २” हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.याच दरम्यान सद्गुरु यांनी अक्षय कुमारच्या “OMG २” चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. ज्यावर अक्षयने देखील त्याची प्रतिकिया दिली आहे.
पाहा omg 2 बद्दल सद्गुरू काय म्हणाले (‘OMG 2’ special screening)
सध्या अक्षय कुमारने योगी सद्गुरू यांच्या साठी “OMG २” चित्रपटाचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं होतं.चित्रपट पाहिल्यानंतर सद्गुरूंनी त्यांच्या सोशल मीडियावरून चित्रपटविषयीच मत व्यक्त केलं आहे, ट्विट करत स्वामींनी चित्रपटाचा कौतुक केलं आहे. म्हणाले, “नमस्कार अक्षय कुमार, “OMG २” चित्रपटातील दृश्य अद्भुत आहेत.ज्या समाजात स्त्रिया सुरक्षित असतील, त्यांना सन्मान मिळेल असा समाज निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. चित्रपट उत्तम आहे. आजच्या पिढीने हा चित्रपट आवर्जून पाहावा.”
हे देखील वाचा – सुष्मिता सेनसोबत ‘ताली’ वेब सीरिजमध्ये झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

सद्गुरुंच्या ट्विटवर अक्षयने देखील प्रतिक्रिया दिली आहे, नमस्कार सद्गुरू, माझा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिलात ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे.चित्रपट पाहिल्यानंतर वेळात वेळ काढून तुम्ही प्रतिक्रिया कळवली. तुम्हला चित्रपट आवडला व तुम्ही आम्हला आशीर्वाद दिलात म्हणून मी व माझी टीम भरून पावलो.” तसेच ‘OMG २’ , ‘गदर २’, ‘एनिमल’ हे तीन बिग बजेट चित्रपट एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोणता चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार हे बघणं रंजक ठरणार आहे.