Riteish Deshmukh Net Worth : रितेश देशमुख हा बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने ‘मस्ती’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय, तो ‘मुंबई फिल्म कंपनी’चा सह-संस्थापक देखील आहे, ज्याने ‘वेड’ सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. रितेश देशमुखला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्याने बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांमधून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. याच बरोबर तो खूप विलासी आयुष्यही जगतो. बरेचदा तो त्याच्या कुटुंबासह स्पॉट होताना दिसतो. रितेश कामाबरोबर त्याच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतो. बायको, मुलांबरोबर तो त्याच्या वेळ घालवताना दिसतो.
रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांचा मुंबईतील वरळी येथे एक आलिशान बंगला आहे. त्याची किंमत सुमारे ३०-४० कोटी रुपये आहे. हे घर त्यांचे वडील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बांधले होते. याशिवाय, लातूरमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घर देखील आहे. रितेश देशमुख खेळांमध्येही खूप सक्रिय आहे. त्याने ‘वर्ल्ड पिकलबॉल लीग’च्या पुणे युनायटेड संघात गुंतवणूक केली आहे. याशिवाय, तो ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मधील एका संघाचा मालक देखील आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख हे ‘पोकेमॉन गो’, ‘व्हिडिओकॉन’, ‘टॅब कॅपिटल’ आणि ‘सेन्स स्मार्ट टीव्ही’सह अनेक ब्रँडचे राजदूत आहेत.
अहवालानुसार २०२५ मध्ये रितेश देशमुखची कमाई १४० करोडच्या आसपास असल्याचं बोललं जात होतं. त्याची कमाई चित्रपट, प्रॉडक्शन हाऊस, ब्रँड एन्डोर्समेंट्स आणि रिअल इस्टेट गुंतवणूकीतून येते. रितेश देशमुखला लक्झरी कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे Bentley Flying Spur (₹3.5 करोड़), Land Rover Range Rover Vogue (₹2 करोड़), BMW 7-Series (₹1.4 करोड़), Mercedes-Benz S-Class (₹1.3 करोड़), Tesla Model X (₹95 लाख), BMW iX EV (₹1.16 करोड़) या गाड्या आहेत.
आणखी वाचा – कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…
रितेश देशमुखने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून आपली कारकीर्द सुरु केली. यानंतर, त्याने ‘मस्ती’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. रितेश देशमुखने अलीकडेच ‘वेड’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.