मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अर्धवट माहिती देऊन…”, प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, “यामुळे माझं कुटुंब…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sudesh Mhashilkar Reacts Prachi Pisat

"अर्धवट माहिती देऊन…", प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, "यामुळे माझं कुटुंब…"

Sudesh Mhashilkar Reacts Prachi Pisat : मराठी मनोरंजन विश्वात प्राची पिसाट आणि सुदेश म्हशीलकर यांचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. सुदेश यांनी प्राचीला आक्षेपार्ह मॅसेज केल्याचे आरोप तिने सोशल मीडियावर थेट पोस्ट करत केले. गेल्या पाच-सहा दिवस हे प्रकरण एकतर्फी सुरु आहे. अनेकांनी प्राचीच्या धाडसाचे कौतुक केले. तर काहींनी प्राचीला पाठिंबा देत अन्यायाबाबत आवाज उठविण्यास सांगितले. अनेक कलाकारांनीही प्राचीच्या पोस्टनंतर सुदेश यांच्यावर टीका केली. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत सुदेश नेमकं काय बोलणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर सुदेश यांनी इंस्टाग्राम पोस्टमार्फत प्राचीने केलेल्या आरोपांवर मौन सोडलं आहे. सुदेश यांनी पोस्ट शेअर करत आपली सविस्तर बाजू मांडली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे अकाउंट हॅक झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची प्रतही जोडली आहे. भाईंदर, ठाणे या पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अभिनेते सुदेश म्हशीलकरांची पोस्ट

खरंतर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो, पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरु आहे, त्यावर अनेक लोकांचे, मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.

आणखी वाचा – भारती सिंहची तब्येत बिघडली, रक्त तपासणी करताना घाबरली अन्…; नेटकरी म्हणाले, “करोना तर…”

1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”

तो मेसेज माझ्याच अकाउंटवरुन गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे

View this post on Instagram

A post shared by Sudesh Mhashilkar (@sudeshmhashilkar)

2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”

मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.

पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अशाप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

आणखी वाचा – “मराठी बोलता, वाचता येत नाही…”, लोकप्रिय अभिनेत्याकडून टेलिव्हिजन विश्वातील सत्य परिस्थिती समोर, म्हणाला, ” उगाचच डोक्यावर…”

3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”

माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”

मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो. कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Prachi Pisat (@prachipisat11.11)

आणखी वाचा – “माझी मुलगी तर गेली…”, भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, “एखाद्या लेकराबाबत असं…”

5) “प्राचीला कॉल करुन पोस्ट काढायला धमकावलं?”

माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मॅसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहीत नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”

‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात.

अभिनेते सुदेश म्हशीलकर (Sudesh Mhashilkar) यांनी ‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असा मॅसेज प्राचीला केला. प्राचीनं हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याचा चेहरा सर्वांसमोर आणला. मात्र याचवेळी तिने अभिनेत्यावर अनेक आरोपही केले. अखेर अभिनेत्रीने केलेल्या या आरोपांवर सुदेश यांच्या पोस्टने चांगलंच उत्तर दिलं आहे.

Tags: entertainmentPrachi PisatSudesh Mhashilkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Nivedita Saraf Post

"माझ्या आयुष्यातला हिरो…", अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदिता सराफ म्हणाल्या, "तुझा प्रवास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.