Mukul Dev Passed Away : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता मुकूल देवच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी्रच श्रीमंती की फक्त देखालाकाहीला मोठा धक्का बसला आहे. मुकूलच्या निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर कलाकार मंडळींनीही हळहळ व्यक्त केली. अवघ्या ५४व्या वर्षी मुकूलने जगाचा निरोप घेतला. गेल्या काही काळापासून मुकूल आजारीच होता. आई-वडिलांच्या निधनानंतर तर तो आणखीनच खचला. त्याने स्वतःला घरात कोंडून घेण्यास सुरुवात केली. फार कमी लोकांच्या संपर्कात तो राहिला. इतकंच काय तर घरातून बाहेर पडणंही मुकूलने टाळलं होतं. त्याचबरोबरीने मुकूलचं वैवाहिक आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. पत्नी शिल्पा देवबरोबर घटस्फोट झाल्यानंतर तो एकटाच पडला. नक्की मुकूलचं आयुष्य कसं होतं? याविषयी आता विविध चर्चा रंगत आहेत. (actor mukul dev last post)
पत्नीने साथ सोडली, घटस्फोटानंतर…
नवी दिल्लीमधील पंजाबी कुटुंबातील मुकूलने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. भाऊ व सुप्रसिद्ध अभिनेता राहुल देवही त्याच्या जोडीला होता. मुकूल व राहुलचं नातं अगदी घट्ट होतं. मुकूलचे वडील हरी देव पोलिस होते. तर आई अनुप शिक्षिका होत्या. २०१९मध्ये मुकूलच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर पाठोपाठ आईही गेली. मुकूल कुटुंबाबरोबर भावनिकरित्या अधिक जोडला गेला आहे. त्यामुळे आई-वडिलांचं जाणं, घटस्फोट त्याला सहन न होणारा होता.
लेकीलाही बरोबर घेऊन गेली आणि…
अभिनेत्री दीपशिखा नागपालनेही इंडिया टुडेला राहुलाबाबत माहिती दिली. ती म्हणाली, “मुकूलबरोबर फार कमी बोलणं व्हायचं. व्हॉट्सएप ग्रुपवरही तो होता. मात्र तो खूपच कमी सक्रिय असायचा”. शिल्पाबरोबर मुकूलने अगदी थाटामाटात लग्न केलं. मुंबईतील पाली हिल परिसरात तो कुटुंबाबरोबर राहत होता. २००५मध्ये शिल्पा व मुकूलचा घटस्फोट झाला. शिल्पाने नवऱ्याला सोडलं पण बरोबर त्यांच्या दोन वर्षाची मुलगी सियालाही ती तेव्हा बरोबर घेऊन गेली होती. छोट्या-मोठ्या वादावरुन शिल्पा व मुकूलचा घटस्फोट झाला. अधून-मधून तो लेक सियाला भेण्यासाठी दिल्लीला जायचा.
पायलटचंही घेतलेलं प्रशिक्षण
आधी घटस्फोट नंतर आई-वडिलांचं एकापाठोपाठ एक निधन झाल्यानंतर मुकूल एकटा पडला. २०२२मध्ये ‘अंत द एण्ड’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. मुकूलने पायलटचंही प्रशिक्षण घेतलं होतं. एका एअरलाइन कंपनीमध्येही त्याने काम केलं होतं. २०१७मध्ये मुकूल अचानक चर्चेत आला. त्यामागचं कारणंही तसंच होतं. त्याला जेट एअरवेजच्या विमानामधून उतरवण्यात आलं होतं. कारण त्याच्याजवळ ई-सिगारेट सापडलं होतं. दरम्यान त्याची बरीच चर्चा रंगली होती.
तीन महिन्यांपूर्वीच मृत्यूचे संकेत
मुकूल गेल्या काही काळापासून आजारीच होता. एकट्याने आजाराशी लढा देत होता. एकटेपणा मुकूला खात होता असं त्याच्या जवळच्या मंडळींचं म्हणणं आहे. त्याच्या निधनानंतर आता मुकूलची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. मुकूल पायलट असल्यामुळे त्याने सिंगल सिटर एअरक्राफ्ट विमान चालवण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं होतं की, “…तर मी तुम्हाला चंद्राच्या काळ्या बाजूला भेटेन”. तीन महिन्यांपूर्वीची मुकूलची ही पोस्ट होती. यावरुनच तीन महिन्यांपूर्वी मुकूलला त्याचं मरण दिसलं होतं का? अशी चर्चा होत आहे.