Mukul Dev Passes Away : कलाविश्वातील सुप्रसिद्ध चेहरा अभिनेता मुकूल देवचं निधन झालं आहे. तो ५४ वर्षांचा होता. मुकुलच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अवघ्या पन्नाशीमध्येच मुकूलने जगाचा निरोप घेतला. त्याचं निधन नक्की कशामुळे झालं? हे अद्यापही समोर आलेलं नाही. मुकूलच्या कुटुंबियांनीही सध्या याबाबत काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. मुकूलच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुकूल बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राहुल देवचा भाऊ आहे. मुकूलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच कलाविश्वातील मंडळी हळहळ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियाद्वारे चाहते मंडळी मुकुलला श्रद्धांजली वाहत आहेत. (mukul dev passed away)
प्रसारमाध्यमांच्या काही रिपोर्ट्सनुसार, मुकूल गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. या आजारपणातच त्याने अखेरचा श्वास घेतला. तर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता विंदू दारा सिंगनेही मुकूलबाबत काही खुलासा केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना विंदूने मुकूलविषयी माहिती दिली. तो म्हणाला, “आई-वडिलांच्या निधनानंतर मुकूल एकदम शांत झाला. तो एकटा एकटाच राहत होता. तो घराबाहेर येत नव्हता. मित्र परिवार किंवा कामानिमित्त कोणाला भेटायलाही मुकूल यायचा नाही. गेल्या काही दिवसांमध्ये त्याची तब्येतही ठिक नव्हती”.
पुढे विंदू म्हणाला, “मुकूल आजाराची असल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. गेले काही दिवस त्याच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु होते. मी मुकूलचा भाऊ, त्याचे कुटुंबिय व जवळचा मित्रपरिवार यांच्या दुःखात सहभागी आहे. माणूस म्हणून तो खूप चांगला होता. आम्हाला त्याची खूप आठवण येईल”. मुकूलने आजारपणाशी दोन हात केले. मात्र अखेरीस त्याची मृत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
आणखी वाचा – काठी-रॉडने मारहाण, कानाचा पडदाही फाटला अन्…; वैष्णवीनंतर सोलापूरात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र हादरला
मुकूलने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. इतकंच नव्हे तर तो हिंदी मालिकांमुळे घराघरांत पोहोचला. टेलिव्हीजनवरील नावाजलेल्या अभिनेत्यांमध्ये मुकूलचं नाव घेतलं जाऊ लागलं. १९९६ला ‘मुमकिन’ मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. ‘वजूद’, ‘कोहराम’, ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’, ‘आर राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या चित्रपटात मुकुलने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कहीं दिया जले कहीं जिया’, ‘कहानी घर घर की’, ‘प्यार जिंदगी है’ यांसरख्या त्याच्या मालिका विशेष गाजल्या.