महिला खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न नेहमीच चर्चेत आणि जैसे थे राहिला आहे. दिवसागणिक महिलांवर होणारे अत्याचार व त्यासंदर्भातील घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. सर्वसामान्य महिलांनाच नव्हे तर कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींनाही वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. कित्येकदा अभिनेत्री याबाबत उघडपणे बोलतात. सार्वजनिक ठिकाणीही अभिनेत्रींना बऱ्याचदा विचित्र नजरेने पाहिलं जातं. असाच प्रकार आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर घडला आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री पुजा ठोंबरेबरोबर सकाळच्या दरम्यान वाईट अनुभव आला. याचबाबत तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्टोरी शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला. (Pooja thombre bad experience)
पूजा सकाळी चालण्यासाठी घरातून बाहेर पडली. तिने नेहमीच्या ठिकाणी चालण्यासाठी सुरुवात केली. तीन राऊंडही पूर्ण केले. पण एका अंकलचा केअरटेकर तिच्याकडे एकटक पाहत होता. यावर त्या अंकलला तक्रार करताच त्याने अगदी लज्जास्पद उत्तर दिलं. पूजा म्हणाली, “सकाळी चालत असताना एका अंकलचा केअर टेकर मी अगदी लांब जाईपर्यंत माझ्याकडे एकटक बघत होता. चालत असताना माझे तीन राऊंड झाले. त्यानंतर मी त्याला झापलं”.
आणखी वाचा – “पहिल्याच पावसात BMCची लायकी कळाली”, रस्त्यावरील कचरा पाहून भडकला मराठी अभिनेता, भयावह व्हिडीओ समोर

“त्यानंतर मी त्या अंकल्याच ग्रुपकडे गेले. खरंच तो त्या अंकलबरोबर आला आहे का? हे मला बघायचं होतं. तो एका अंकलबरोबरच आला होता. त्या अंकलला मी झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. यावर अंकलने मला उत्तर दिलं की, “अरे लडकियों को तो मैं भी देखता हुँ. इतना क्या…”. त्या उत्तरावर बाजूचे दोन अंकल्स छान खुलून हसले. माझ्याच बरोबर चालत असलेल्या मुलीकडेही तो माणूस असाच बघत होता”.
“ती मुलगी मला म्हणाली, मी ऐकलं तू जे बोलत होतीस. मी काहीच बोलले नाही कारण ते अंकल आणि मी एकाच सोसायटीमध्ये राहतो. तर हे सगळं मी यासाठी सांगितलं की, मुलींनो असं तुमच्याबरोबरही होत असेल तर हे नॉर्मल आहे. त्याचं मोठं भांडवल करायची काही एक गरज नाही”. पूजाने सांगितलेला हा संपूर्ण प्रकार धक्कादायक होता. शिवाय अंकलला हा संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्याचं उत्तर भूवया उंचवणारं होतं.