उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात एकदा तरी जावं आणि महादेवाचा आशिर्वाद घ्यावा हे अनेकांच्या बकेटलिस्टमध्ये आहे. केदारनाथला जाणं प्रत्येकाच्याच नशिबी नसतं असंही अनेकदा बोललं जातं. महादेवाचं बोलावणं आल्यानंतरच आपण त्या मंदिरापर्यंत जाऊ शकतं अशी बऱ्याच भक्तांची भोळी समजूत आहे. पण या मंदिरात गेल्यानंतर आयुष्यभराचा थकवा क्षणात निघून जातो असंही अनेक भक्त व दर्शन घतलेले प्रत्यक्षदर्शी सांगतात. काही दिवसांपूर्वीच केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सुरु झाल्यानंतर लाखो भक्तांनी आतापर्यंत केदारनाथाचे दर्शन घेतलं. मात्र या देवस्थानी एक गोष्ट सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एक पाण्याच्या बॉटलची किंमत. याचसंदर्भात एका तरुण व्यक्तीने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Kedarnath viral video)
केदारनाथला जाण्यासाठी जसजसा डोंगराचा चढ चढतो तसतसं खाण्याच्या वस्तूही महाग होत जातात. केदारनाथला गेलेल्या कित्येक जणांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल. २० रुपयांची पाण्याची बॉटलही १०० रुपयांना विकली जाते. चार-पाच पट दुपटीने पाण्याची बॉटल का विकली जाते? हा प्रश्न तुम्हालाही असेल तर खाली दिलेला व्हिडीओमधून नक्कीच उत्तर मिळेल. केदारनाथसारख्या ठिकाणी व्यवसाय करणं म्हणजे कठीणच.
पाहा व्हिडीओ
केदारनाथला रिकाम्या हातानेही चढताना अनेकांची अवस्था बिकट होते. एका उंचीवर पोहोचल्यानंतर श्वास घेणंही कठीण होतं. पण अशा परिस्थितीतही तेथील स्थानिक लोक व्यवसाय करतात. मॅगी, इतर खाण्याचे पदार्थ विकतात. त्याचबरोबरीने पाण्याच्या बॉटलची विक्री करतात. पण पाण्याच्या बॉटल्सचं ओझं उंचीवर नेणं म्हणजे तारेवरची कसरतच. एका तरुण मुलाने अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये एक माणूस पाण्याच्या बॉटल्सचं ओझं पाठीवरुन नेताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर एकूण ४० किलोचं ओझं आहे.
आणखी वाचा – दीपिका कक्करला मोठा आजार, पोटात ट्युमर अन्…; रुग्णालयात अशा परिस्थितीत आहे अभिनेत्री, व्हिडीओ समोर
तरुण विचारतो, “पाण्याच्या बॉटलची किंमत १०० रुपये का?”. यावर ओझं नेणारा व्यक्ती म्हणतो, “मला हे ओझं वरती पोहोचवण्यासाठी २५०० रुपये मिळतात. तसेच प्रत्येक बॉटलमागे मिळणारे पैसे वेगळे असतात. त्रास तर होतो पण काय करणार?”. थंडीच्या वातावरणातही ओझं वरती नेणारा तो माणूस घामाने भिजला होता. पैशांसाठी कष्ट करणारी ही मंडळी पाहून अनेकांनी भावनात्मक कमेंट केल्या आहेत. मुळचा नेपाळची असणारी ही व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करत पैसे कमवत आहे. त्याच्या जिद्दीला सलाम.