Dipika Kakar Ibrahim Video : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या तिच्या तब्येतीमुळे चर्चेत आली आहे. दीपिकाच्या यकृतामध्ये ट्यूमर आढळला असून तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दीपिकाचा नवरा शोएब इब्राहिमने एक व्हिडीओ बनवत चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे आणि दीपिकासाठी प्रार्थना केली आहे. शोएबने सांगितले की, दीपिकाला यावर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नाही. अलीकडेच दीपिका आणि शोएब रुग्णालयातही जाताना दिसले. शोएब दीपिकाच्या तपासणीसाठी कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये गेला. दरम्यान, दवाखान्यातील दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये, दीपिका पहिल्या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेली दिसली आणि नंतर ती रुग्णालयाच्या पलंगावर दिसली. शोएब आणि दीपिकाची आई तिच्याबरोबर दिसली आणि तिचे सांत्वन करताना दिसत आहे. शोएब दीपिकाशी बोलत आहे. दीपिका वारंवार शोएबचा हात धरताना दिसत आहे. दीपिकाच्या यकृत ट्यूमरच्या उपचारादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं नेटकरी सांगत आहेत. परंतु हे खरे नाही. हा व्हिडीओ जुना आहे आणि दीपिकाच्या गरोदरपणातील आहे. शोएब इब्राहिमने YouTube वर दीपिकाच्या गरोदरपणातील एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ २० जून २०२३ चा आहे. दीपिकाने २१ जून रोजी मुलगा रुहानला जन्म दिला.
आणखी वाचा – अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, “सुरुवातीला एक काळ होता की…”
आता दीपिका यकृत ट्यूमरशी झगडत आहे. शोएबने सांगितले की दीपिकाला प्रथम पोटदुखी सुरु झाली. जेव्हा ही वेदना थांबली नाही, तेव्हा त्यांनी डॉक्टरांना दाखवले. त्यानंतर डॉक्टरांनी यकृत ट्यूमरबद्दल सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की यावर उपाय म्हणून शस्त्रक्रिया करावी लागेल. हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून दीपिका आणि शोएब मुलगा रुहानच्या काळजीत आहेत, कारण रुहान दीपिकाशिवाय राहत नाही.
आणखी वाचा – ५०शीमध्येही सोनाली कुलकर्णी इतक्या फिट कशा?, अभिनेत्रीने सांगितल्या खास टिप्स, तुमच्यासाठीही उपयोगी
दीपिकाच्या तब्येतीबाबत शोएब म्हणाला, “दीपिकाची तब्येत ठीक नाहीये, तिला पोटाचा थोडा त्रास आहे जो गंभीर आहे. मी चंदीगडमध्ये असताना, दीपिकाला पोटदुखी सुरू झाली आणि सुरुवातीला आम्हाला वाटले की ते आम्लपित्तमुळे आहे आणि आम्लपित्तशी संबंधित समस्या आहे असे समजून तिच्यावर उपचार केले. पण जेव्हा वेदना कमी झाल्या नाहीत. रक्ततपासणीदरम्यान दीपिकाच्या यकृतात ट्यूमर असल्याचे दिसून आले”.