Abhijeet Bhattacharya On Celebs : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य पद्धतीने उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये प्रवेश केला आणि पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांना नेस्तनाबुत केले. संपूर्ण देशाला भारतीय सैन्याच्या या कारवाईचा अभिमान वाटला आहे, परंतु बॉलिवूड कलाकारांनी त्यावर शांतता ठेवली. हातावर मोजण्याइतक्या असलेल्या कलाकारांनी यावर बोलणं पसंद केलं तर अनेक बड्या कलाकारांनी या घटनेवर चकार शब्दही काढला नाही. त्याचवेळी, सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध भट्टाचार्य यांनी नुकत्याच झालेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांची नावे न घेता त्यांना लक्ष्य केले आणि ते म्हणाले की, ते पान मसाला विकतील पण पाकिस्तानविरूद्ध काहीही बोलणार नाहीत.
पाकिस्तानी कलाकार अधिक राष्ट्रवादी
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, “पाकिस्तानचे कलाकार आमच्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी आहेत. ते अजूनही आमच्याविरुद्ध आपला आवाज उठवत आहेत. आम्ही त्यांना पैसे दिले. आम्ही त्यांना नाव दिले. तेथील केवळ स्थानिक लोक त्यांना ओळखतात. वर्ल्ड वाइड ओळख ही त्यांना आपण करून दिली. आणि आज ते आपल्याच विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत”.
अभिजीत यांना पुढे बॉलिवूडच्या कलाकारांवर प्रश्न विचारला यावर ते म्हणाले, “येथे शांतता आहे. आणि आपण काय करीत आहोत? आम्ही स्वतः विरुद्ध बोलत आहोत. एकतर आपण बोलत आहोत वा बोलतही नाही आहोत. सर्वत्र शांतताही झाली आहे. गुटखा विक्री करेल. पुड्या विक्री करेल पण हवं तेव्हा बोलणार नाही. पाकिस्तानचा नाश करु असे त्यांच्या तोंडातून कधीच बाहेर येणार नाही”.
कलाकारांच्या तरुण पिढीला पाकिस्तानच्या अनुयायांबद्दल अधिक चिंता
अभिजीत पुढे म्हणाले, “पाकिस्तान हा शब्द तोंडातून बाहेर पडणार नाही. अभिनेते किंवा अभिनेत्रींच्या चाहत्यावर्गाची एक तरुण पिढी आहे. चित्रपटसृष्टीत तो कदाचित याबद्दल अधिक जाणीव ठेवतो कारण त्याला असे वाटते की पाकिस्तानमध्ये त्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे”.