Rohit Sharma Family Emotional : वानखेडे स्टेडियमला गेल्याच वर्षी ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईच्या खेळाडूंचं माहेरघर अशी या स्टेडियमची ओळख आहे. अनेक होतकरू क्रिकेटरने याच पटांगणावर अहोरात्र मेहनत करत आपली स्वतःची ओळख निर्माण करत देशाचे नाव मोठे केले. यापैकी एक नाव म्हणजे रोहित शर्मा. बोरिवली, मुंबई येथे स्थायिक असणाऱ्या रोहितने वानखेडे स्टेडियमवर दिवसरात्र मेहनत करत मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळात भारतीय संघात स्थान मिळवले. अतिशय संवेदनशील असणाऱ्या या खेळाडूच्या संवेदनशीलतेच पुन्हा एकदा याचं वानखेडे स्टेडियमवर दर्शन मिळाले.
काल मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये हिटमॅन रोहित शर्मा याच्या नावाच्या स्टँडचं अनावरण झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. तर क्रिकेटरच्या कुटुंबातून त्याचे आई-वडील आणि पत्नीची उपस्थिती पाहायला मिळाली. रोहितने आपल्या नावाच्या स्टँडचं अनावरण होत असताना आई-वडिलांना विसरला नाही. तो आई-वडिलांना घेऊन जाण्यासाठी मंचावरुन खाली उतरला. त्याने आई-वडिलांच्या हस्ते आपल्या नावाच्या स्टँडचं अनावरण केलं. यावेळी त्याची पत्नीही मंचावर होती.
रोहितची ही कृती पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. हा क्षण खूप खास असला तरी रोहितचे कुटुंबीय मात्र यावेळी भावुक झालेले पाहायला मिळाले. रोहितच्या आई-वडिलांच्या आणि पत्नीच्या डोळ्यांत अश्रू होते, हे पाहून उपस्थितही भावुक झाले. रोहित हा फॅमिली मॅन आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. त्यात त्याच्या नावाच्या स्टॅन्डच्या अनावरणावेळी त्याने आई-वडिलांना दिलेला मान पाहून तर अनेकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – प्रिन्स नरुलाने बायकोची गर्भनाळ स्वतःच कापली अन्…; युविका चौधरी म्हणाली, “सी-सेक्शन पाहिलं, शूट करत…”
“आज जे घडत आहे त्याबद्दल मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. लहानपणी माझं स्वप्न होतं की, मी मुंबई आणि भारतासाठी खेळावं. क्रिकेटच्या महान खेळाडूंमध्ये नाव येणं हे शब्दांमध्ये मांडता येणार नाही. हे यासाठी देखील खास आहे, कारण मी अजूनही खेळत आहे. मी क्रिकेटच्या दोन फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आज मी एक फॉर्मेट खेळत आहे”, अशी भावना रोहित शर्माने आपल्या भाषणात व्यक्त केली.