Amruta khanvilkar Block Himanshu Malhotra : सिनेसृष्टीत अशा बऱ्याच कलाकार जोड्या आहेत ज्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे आणि त्यांचा सुखाचा संसारही सुरु आहे. अशीच एक लोकप्रिय कलाकार जोडींपैकी एक जोडी म्हणजे अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा. अमृता आणि हिमांशू ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. फार कमी वेळा ही जोडी एकत्र स्पॉट होताना दिसली तरी ते नेहमीच चर्चेत असतात. अमृता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार कमी वेळा बोलते. अमृताच्या अभिनयाची, चित्रपटांची जितकी चर्चा होते, तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही होत असते. अमृता आणि हिमांशू एकत्र राहत नसल्यानेही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. मात्र याचे योग्य असे कारण देत दोघांनीही त्यांच्यात किती प्रेम आहे हे साऱ्यांना दाखवून दिले.
असं असलं तरी संसार म्हटलं की, लुटुपुटुची भांडणही होणारचं. अमृता आणि हिमांशू यांच्या नात्यातही भांडण पाहायला मिळाली आहेत. सहा वर्षांपूर्वी अमृता आणि हिमांशू यांच्यातही गैरसमजुतीने भांडण झाली होती. अमृता तशी स्वभावाला रागीट आहे मात्र हिमांशू तितकाच समजूतदार असल्याने त्यांच्यातील हा वाद लगेचच निवळला. असं असलं तरी नवरा-बायकोमधील हा वाद तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत हिमांशूने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. हिमांशूने नुकतीच ‘फिल्मी बिट’ला मुलाखत दिली. यावेळी हिमांशूने अनेक विषयावर गप्पा मारल्या. त्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. मध्यंतरी हिमांशु आणि अमृतानं एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं हा मुद्दाही यावेळी निघाला. याबद्दल बोलताना हिमांशूने तेव्हा नेमकं काय घडलं होतं याबाबत देखील सांगितलं.
आणखी वाचा – “भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”
‘फिल्मी बीट’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, “होय, अमृतानं त्यावेळी मला ब्लॉक केलं होतं. झालं असं की, मी तेव्हा राजस्थानला शूटिंग करत होतो. तिला माझ्याशी काही तरी बोलायचं होतं. पण मला तेव्हा शक्य झालं नाही. ती जरा रागीट स्वभावाची आहे. लगेच चिडली आणि रागारागात तिने तेव्हा मला अनफॉलो केलं होतं. हे सगळं झालं. त्यानंतर आमच्यात बोलणंच झालं नव्हतं. मी नंतर घरी गेलो तेव्हा तिची समजूत काढली. पण असं नंतर परत कधी घडलं नाही. यातून आपण शिकत जातो”, असंही तो म्हणाला.
आणखी वाचा – तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?
अमृता खानविलकरने २०१५ मध्ये हिमांशू मल्होत्रा बरोबर लग्न केले होते. विशेष म्हणजे दोघेजण लग्नापूर्वी साधारण दहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. २००४ मध्ये ती दोघं एकमेकांना पहिल्यांदाच भेटले होते. हळूहळू मैत्री झाली आणि मग ते एकमेकांवर प्रेम करु लागले. अमृता महाराष्ट्रीयन तर हिमांशू पंजाबी आहे. अमृता मुंबईची लेक तर हिमांशू दिल्लीचा मुलगा आहे.