India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सीमेलगत भारतीय सैनिक देशाच्या रक्षणासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर भक्कम उभे आहेत. त्याचबरोबरीने सीमेलगत असलेल्या गावांमध्ये नुकसान होऊ नये म्हणून खबरदारी बाळगत आहेत. मात्र पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्यासाठी दोन हात करताना काही भारतीय सैनिकांना वीरमरण पत्करावं लागलं. शहीद जवानांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश तर भारतीयांच्या मनावर खोलवर रुजलेला आहे. अशातच आता आणखी एका शहीद जवानाच्या पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. देशाचं रक्षण करत असताना सीमेवर सैनिक सुरेंद्र कुमार मोगा यांना वीरमरण आलं. (Martyr surendra mogas wife emotional)
राजस्थानमधील मेहरादासी गावातील सुरेंद्र मोगा यांचा देशसेवा करण्याचा ध्यास होता. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान सीमेलगतच्या भागात सुरेंद्र देशसेवा करत होते. सुरेंद्र यांचं पार्थिव त्यांच्या गावातील राहत्या घरी नेण्यात आलं. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. मात्र त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोश ऐकून सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा लागल्या. जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख काय असू शकतं? हे त्याक्षणी हजारो भारतीयांना बहुदा जाणवलं असावं.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
“उठ ना रे प्लीज उठ”
सुरेंद्र यांचं पार्थिव पाहून पत्नीने दोन वेळा I love u म्हटलं. त्यानंतर जय हिंद म्हणत पतीला सॅल्युट केलं. यावेळी तिचा उर अभिमानाने भरुन आला होता. पण त्याचवेळी डोळ्यांतले अश्रू काही थांबत नव्हते. सुरेंद्र यांना शेवटचं पाहताना पत्नी सीमा यांची झालेली अवस्था उपस्थितांनाही बघवेना. त्यांचे हात, पाय, ओठ एकूणच संपूर्ण शरीर थरथरत होतं. पतीच्या डोक्यावरुन व गालावरुन त्यांनी हात फिरवाल आणि एकच हंबरडा फोडला, “आता उठ यार, प्लीज आता तरी उठ”.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाने पाकिस्तानी लोकांची मागितली माफी, भारतीयच राग करतात म्हणाला अन्…; नेटकरी भडकले
उभंही राहवेना अन्…
सुरेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हवाई दलातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सुरेंद्र यांच्या पत्नीजवळ त्याचा युनिफॉर्म दिला. हा युनिफॉर्मला सीमा यांनी जीवाशी कवटाळलं. पार्थिव ज्या पेटीमध्ये ठेवण्यात आलं होतं ती पेटी ती सतत उघडायला सांगत होती. शिवाय त्यांची ११ वर्षीय मुलगी आईला वारंवार सांभाळत होती. दरम्यान पतीला शेवटचं पाहताना सीमा बेशुद्ध पडत होत्या. शहीद सुरेंद्र यांच्या संपूर्ण कुटुंबियांना या संपूर्ण घटनेमधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी ताकद मिळो इतकंच…