गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 11, 2025 | 5:00 pm
in Lifestyle
Reading Time: 1 min read
google-news
Kitchen Hacks

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

आई आज काय तरी स्पेशल बनव ना… काय तरी चटपटीत हवं… असं आपण पटकन म्हणतो. मग आईची आज काय बनवूया? या प्रश्नापासून कसरत सुरु होते. ती आई जर कामावर जाणारी असेल तर मग झालंच… फक्त धावपळ धावपळ आणि किचनमध्ये चटपटीत पदार्थ बनवण्याची धडपड. मग अशावेळी काही छोट्या पण उपयोगी ठरणाऱ्या किचन टीप्स महत्त्वपूर्ण असतात. लसूण सोलण्याची पद्धत ते अगदी अंड उकडण्यापासून सोपं कसं होईल? हे आम्ही आज घेऊन आलो आहोत. खाद्यक्षेत्रात हातखंड असलेली मधुरा बाचलने काही महत्त्वाच्या व उपयोगी टीप्स दिल्या आहेत. महिलांसाठी त्या अगदी उपयोग ठरतील. त्या नेमक्या काय? चला जाणून घेऊया. (Kitchen Tips)

लसूण पटकन सोलायचा कसा याबाबत मधुराने खास टीप्स दिली. कित्येक स्त्रिया घाई गडबडीमध्ये लसूण छोट्या दगडाने किंवा किचनमध्ये असलेल्या जड वस्तूने ठेचतात. तिच लसूण फोडणीला घालतात. पण लसूण सोलण्याचा सोपा उपाय आणि पटकन होणारं काम यासाठी खास टीप्स मधुराने दिल्या.

– लसूणाची पूर्ण कांडी घ्या

– ही लसणाची कांडी गॅसवर थोडं अतंर ठेऊन हातात पकडा

– लसणाच्या कांडीला उब लागली की, लसूण पटकन सोलून होतो

आणखी वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या ‘त्या’ दोन महिला कोण?, कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंहची चर्चा

कित्येकदा भाजीमध्ये शेंगदाण्याचा वापर हमखास केला जातो. घाटावर राहणारी कित्येक मंडळी तर बहुतांश शेंगदाण्याच्या कुटातच जेवण बनवतात. मग अशावेळी शेंगदाण्याचा अधिक वापर होतो. शेंगदाणे तव्यावर चांगले भाजून टरफलं काढावी लागतात. ती सोप्या पद्धतीने कशी काढायची हे मधुराने सांगितलं.

– शेंगदाणे भाजून झाल्यावर पाकडतो

– पण शेंगदाणे पाकडण्याऐवजी एखादा पदार्थ ज्या मोठ्या झाऱ्याने तळतो ते झारं घ्या

– त्या गाळण सारख्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे ठेऊन टरफलं हमखास काढता येतात

शेंगदाण्याची टरफलं काढण्यासाठी सोपा उपाय

– शेंगदाण्याची टरफलं आणखी सोप्या पद्धतीने काढण्यासाठी एक नवी युक्ती

– शेंगदाणे भाजत असतानाच त्यावर थोडं पाणी शिंपडा

– पाणी थोडं शिंपडलं की शेंगदाण्यामध्ये ते थोडंफार मुरलं जातं.

– पाणी मुरल्यानंतर त्याची वाफ होते आणि टरफलं निघण्यास सहज शक्य होतं

आणखी वाचा – आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

अंड उकडतानाही काही स्त्रियांना त्रास होतो. त्रास म्हणजेच बऱ्याचदा अंड्याचं कवच निघतच नाही. निघालं तर अंड्याला चिटकून राहतं. मग अशावेळी काय करावं? हे जाणून घेऊया.

– अंड उकळत असताना त्याला तडा जातो किंवा कवच चिटकून राहतं

– वरीलप्रमाणे अडचणी येऊ नये म्हणू अंड उकळत असताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावं

– मीठ घालण्याचा फायदा म्हणजे अंड अख्खं राहतं आणि नीट सोललं जातं

Tags: trending news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
usha nadkarni bigg boss marathi
Entertainment

“डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…

मे 15, 2025 | 1:32 pm
April May 99
Entertainment

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता या दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

मे 15, 2025 | 1:05 pm
Kaafi Victim Of Asid Attack
Women

तीन वर्षांची असताना अ‍ॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के

मे 15, 2025 | 11:54 am
Next Post
Akshay Kelkar Wedding

Video : बायकोला मंगळसूत्र घालताना भर मंडपात रडला अक्षय केळकर, अश्रूच थांबेनात अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.