जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ हे थोरल्या मंडळींकडून आपण ऐकत आलो आहोत. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. मात्र अलिकडे अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्याला नेहमी भेटणारी व्यक्ती दुसऱ्यादिवशी डोळे उघडल्यानंतर समोर दिसेल की नाही? हा प्रश्न पडतो. क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला सेकंदाचाही वेळ लागत नाही. मग अशावेळी नशिबापुढेही कोणी जाऊ शकत नाही. सोशल मीडियावरही असे कित्येक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आनंदाच्या क्षणी कुटुंबाबरोबर एकत्र राहणारी व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन जागीच पडते आणि तिचा मृत्यू होतो, अशा कित्येक घटना समोर आल्या. आता असाच काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. नववधूने संसार थाटण्यापूर्वीच डोळे मिटले. हा भयंकर प्रकार काय? हे सविस्तर जाणून घेऊया.
उत्तरप्रदेशमध्ये घडलेली ही घटना आहे. नववधून हाताला मेहंदी लावून लग्नासाठी तयार झाली होती. उत्तरप्रदेशातील बदायूंमध्ये दीक्षा नावाची तरुणी राहत होती. तिचं लग्न ठरलं. विवाहसोहळ्यासाठी कुटुंबातील सगळी मंडळी जमली. सगळे जण आनंदात असताना भलतंच काही घडून गेलं. दीक्षा तिच्या हळदीच्या दिवशी बहिणी व नातेवाईकांसह नाचत होती. तिच्या गालाला हळदही लागली होती. मात्र दीक्षाच्या नशिबात काही भलतंच लिहिलेलं होतं. ज्याची पुसटशीही कल्प्ना कुटुंबिय व आई-वडिलांना नव्हती.
"शादी की खुशियां मातम में बदली"
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) May 5, 2025
उत्तर प्रदेश के बदायूं जिले में शादी से एक दिन पहले युवती की हृदय गति रुकने से मौत हो गयी। परिवार के सदस्यों ने बताया कि रविवार देर रात तक हल्दी की रस्म के दौरान डांस कर रही दीक्षा (22) की अचानक तबीयत बिगड़ गयी, जिसके बाद वह शौचालय गयी, जहां हृदय… pic.twitter.com/lkIruvIamc
नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, रविवारी (४ मे) रात्री उशीरापर्यंत दीक्षा तिच्या कुटुंबियांबरोबर हळदी कार्यक्रमाचा आनंद घेत होती. ती फक्त २२ वर्षांची होती. हळदी कार्यक्रमात डान्स करत असतानाच तिची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर ती शौचालयसाठी गेली. तिथेच तिला हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी (५ मे) दीक्षाचं लग्न होणार होतं. पिनोनी गावातील ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. लग्नाचा मंडप सजलेला असताना वाईट काळ या कुटुंबावर धावून आला. क्षणात सगळीकडे दुःखाची चादर पसरली.
बदायूं पोलिसांनी सांगितलं की, “बराचवेळ दीक्षा शौचालयामधून आलीच नाही. म्हणूनच तिचे वडील दिनेश पाल सिंह बाथरुमजवळ गेले. त्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोकवला. पण आतमधून दीक्षाने काहीच आवाज दिला नाही. कुटुंबातील काही मंडळींनी बाथरुमचा दरवाजा तोडला. समोर विचित्र चित्रच दिसलं. दीक्षा जमिनीवर पडलेली त्यांना दिसली. प्रथमदर्शनीच तिचा मृत्यू झाला असल्याचं दिसून आलं. मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावात राहणाऱ्या मुलाबरोबर दीक्षाचं लग्न होणार होतं”. या घटनेनंतर दीक्षाच्या कुटुंबियांनी तिचं शवविच्छेदन करण्यासही नकार दिला. मात्र हा काळा काळ कुटुंबियांना आयुष्यभराचं दुःख देऊन गेला.