पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. सरकार पाकिस्तानविरोधात कठोर पाऊलं उचलत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी पाकिस्तानाविरोधात विरोध दर्शवला. काहींनी पाकिस्तानाचे झेंडे जाळले. तर काहींनी पाकिस्तानी झेंडे रस्त्यावर लावत पायाने तुडवले. अशातच विलेपार्ले स्थानकाच्या बाहेरील बाजूच्या पायऱ्यांनाही पाकिस्तानाचे झेंडे चिटकवण्यात आले होते. त्यावरुन प्रवासी चालत होते. मात्र सगळं सुरळीत सुरु असताना एका मुस्लिम महिलेने संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. महिला पायऱ्यांवर लावलेले पाकिस्तानाचे झेंडे काढू लागली. या संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. (pakistani flag controversy in vileparle)
नक्की घडलं काय?
पाकिस्तानाचा निषेध म्हणून विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानाचे झेंडे लावण्यात आले. रेल्वे स्थानकावरुन रिक्षास्थानकाकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे हे झेंडे लावण्यात आले होते. रिक्षाचालकांनीच झेंडे चिटकवले होते. तिथे अचानक बुरका घालून एक मुस्लिम महिला आली. आरडाओरड करत पाऱ्यांवर लावलेले झेंडे काढू लागली. यावेळी अनेकांनी तिला विरोध करण्याचाही प्रयत्न केला. मात्र हा झेंडा अशापद्धतीने लावणं म्हणजे पाकिस्तान देशाचा अपमान आहे असं ती म्हणत होती.
आणखी वाचा – अनेक फ्रॅक्चर, जखमा, सहा तास शस्त्रक्रिया अन्…; रुग्णालयात अशा अवस्थेत आहे पवनदीप, पुन्हा ऑपरेशन होणार कारण…
पाहा व्हिडीओ
हे खरोखरच धक्कादायक आहे
— दत्ता चौधरी (@DattaChoud73764) May 5, 2025
आणि संतापजनक सुद्धा
😡😡 pic.twitter.com/eLGRDb917l
झेंडे काढणाऱ्या महिलेला तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी विरोध केला. मात्र तिने वाद घालायला सुरुवात केली. व्हिडीओ शूट करत असताना एक व्यक्ती तू गद्दार आहेस का? असं बोलतो. तेव्हा ती महिला म्हणते, “गद्दार तुम्हीच आहात. झेंडे काढण्यासाठी पाकिस्तानी असणं गरजेचंच आहे का?. कोणत्याही झेंड्याचा असा अपमान करु नका. हा भारत देश आहे. भारतात राहण्याचा आम्हाला हक्क आहे. पोलिसांमध्ये जाऊन तुमच्या सगळ्यांची तक्रार करेन”.
आणखी वाचा – “अचानक हृदयविकाराच्या झटक्याने आई गेली आणि…”, आईबाबत बोलताना समीर चौघुले भावुक, म्हणाले, “या क्षणासाठी…”
“झेंड्यावर पाय ठेऊ नका समजलं ना…” असंही ती महिला वारंवार उपस्थित लोकांना म्हणत आहे. पाकिस्तानाचे झेंडे जमिनीवर लावायचे नाहीत हेही ती वारंवार म्हणत होती. मात्र सदर महिला ही नक्की कोण होती?, तिने असं का केलं?, सतत विरोध का दर्शवला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काहींनी पाकिस्तानाचे झेंडे जमिनीवर लावून निषेध न करता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.