कलाकार अगदी स्वच्छंदपणे पडद्यावर वावरताना दिसतात. मात्र रंगरंगोटी केलेल्या चेहऱ्यामागे काय काय दडलंय? याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नसते. कलालाकारांचं खासगी आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील घडामोडी याविषयी तर जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. इतकंच काय तर कलाकारांचं नातं, लग्न, घटस्फोट कोणापासूनही लपून राहत नाही. काहीजणं आपल्या नात्याबाबत उघडपणे बोलतात. तर काही कलाकार न बोलणंच पसंत करतात. आता स्वप्नील जोशीने प्रेम विषयावर संवाद साधताना त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत खुलेपणाने भाष्य केलं. तसेच त्याचं कॉलेज दिवसांमधील अफेअर, लग्न, घटस्फोट याविषयी तो बेधडक बोलला. (Swapnil Joshi first divorce)
नववीत असताना पहिलं प्रेम
‘दॅड ऑड इंजिनियर’शी संवाद साधताना स्वप्नील प्रेमाच्या वेगवेगळ्या परिभाषा सांगताना दिसला. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील प्रेमाबााच्या खासगी आयु,या खासगी आयु,याबत सांगितलं. म्हणाला, “मी नववीत असताना मला एक मुलगी आवडायची. पण पुढे काही घडलं नाही. तेव्हा काही समज नव्हती. सोशल मीडिया नव्हतं. आताचा नववीतला मुलगा जितका जागरुक आहे तसा मी तेव्हा नव्हतो. मुलगी आवडते म्हणजे काय करायचं? हे माहित नव्हतं. बाजूच्या बँचवर बसा, तिला पेन आवडत असेल तर आपलं पेन काढून द्या हे होतं. तेव्हा तेच प्रेम होतं”.
ब्रेकअपनंतर ऐकलेली गाणी, रडणं
“आता सिच्युएशनशीप वगैरे काय काय आलं आहे. मग कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायला लागली. ते माझं अफेअर खूप सीरियस होतं. बहुतेक तेव्हा ११वी किंवा १२वीमध्ये असेन. त्यानंतर पुन्हा माझं एक अफेअर झालं. ब्रेकअप झालं कारण काही काळाने लक्षात आलं की, या नात्याला काही भविष्य नाही. त्यामुळे याचंही पुढे काय घडलं नाही. ब्रेकअपनंतर हदय तुटतं. पण ते काय दोघांच्या समजूतीने झालेलं नसतं. ब्रेकअपनंतर मीही दुःखी गाणी ऐकायचो. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ वगैरे गाणी मी ऐकायचो. तेव्हा मी रडलोही आहे. पहिल्यांचा हृदय तुटणं खूप भारी असतं. तेव्हा असं वाटतं जग संपलं. पण या दुःखात मी दारू, सिगारेट कधीच प्यायलो नाही. अजूनपर्यंत मी कधीच हे व्यसन केलं नाही”.
लग्नाच्या पाच वर्षातच घटस्फोट अन्…
“ब्रेकअपनंतर दोन-तीन वर्षांनी पुन्हा अफेअर झालं. त्यामधून मग माझं लग्न झालं. लग्नानंतर माझा घटस्फोट झाला. लग्नाच्या दोन वर्षांनी आम्ही वेगळं राहायला लागलो. आणि त्यानंतर आमचा घटस्फोट झाला. म्हणजे लग्नाच्या पाच वर्षांनी आमचा घटस्फोट झाला. मग दुसरं लग्न झालं. आता तिच्याबरोबर मी खूश आहे. बायको व दोन मुलं आहेत. सुखी संसार सुरु आहे. माझा घटस्फोट होत होता तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. आवर्जुन एक उल्लेख करेन की, तेव्हा प्रिंट मीडिया होतं. टेलिव्हीजन मीडियाही होतं. पण मराठी प्रिंटमधल्या एकाही पत्रकाराने माझी बातमी छापली नाही”.
“काही पत्रकार मित्रांनी मला फोनही केले. तुझ्याबाबत अशी अशी बातमी आम्हाला आली आहे पण आम्ही ती छापणार नाही. कारण या बातम्या छापणं मराठीची संस्कृती नाही. माझ्या घटस्फोटाची बातमी त्या दोन-तीन वर्षात एकाही पत्रकाराने छापली नाही हे मी अभिमानाने सांगतो. आता तर खरं आहे की खोटं याचीही कोणी वाट बघत नाही. पूर्वी बरोबर बातमी टाकण्याची ओढ होती. आता पहिली बातमी कोण टाकतं? याची ओढ आहे”. स्वप्नील जोशीने बहुदा पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटाबाबत उघडपणे भाष्य केलं आहे.