कलाक्षेत्रातील कलाकारांचे मैत्रीचे किस्से अनेकदा कानावर येतात. एकत्र काम केल्यानंतर काही कलाकारांमध्ये कायमची घट्ट मैत्री होते. असंच काहीसं गायक मिका सिंग व सलमान खान यांच्याबाबत आहे. गेली अनेक वर्ष चित्रपटांच्यानिमित्ताने सलमान व मिका एकत्र काम करतात. दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. मिका सलमानला अगदी जवळून ओळखतो. याबाबत त्याने स्वतः अनेकदा भाष्य केलं आहे. सलमान कधी काय वागू शकतो? याचा अंदाजही त्याला आहे. पण आता मिकाने सलमानबाबत मोठं भाष्य केलं आहे. संध्याकाळी सहानंतर सलमान अगदी वेगळाच वागतो असा दावा त्याने केला आहे. मिकाच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (mika singh talk about salman khan)
रात्री काही वेगळाच असतो सलमान
मिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला. मीत ब्रदर्ससह सलमानने रात्री एकत्र बसून बिर्याणी खाल्ली. दुसऱ्या दिवशी मीत ब्रदर्स त्याच्याकडून निघाले. याचबाबात मिका म्हणाला, “मी हा किस्सा कुठेच सांगितला नाही. मीत ब्रदर्सने सलमान यांच्याबरोबर बिर्याणी खाल्ली. त्यांना वाटलं सलमान आता आपला चांगला मित्र झाला आहे. पण त्यांना काहीच माहित नव्हतं. सलमान भाई दिवसा चिडचिड करतो. संध्याकाळी सहानंतर त्याला भेटणं कधीही चांगलं हे मला माहित होतं. सहाच्या नंतरही भेटायचं आणि शक्य असल्याचं तयार गाणं घेऊनच. हे सगळं मला माहित आहे. रात्री एकत्र बिर्यानी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी मीत ब्रदर्स ‘रेस ३’च्या प्रीमियरला गेले”.
आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”
दिवसभर स्वतःच्याच विश्वात सलमान
पुढे तो म्हणाला, “रेस ३ला गेल्यावर मीत ब्रदर्स सलमानची वाट बघत होते. सलमान आल्यानंतर ते त्याच्या जवळ गेले. मात्र सलमान त्यांच्याकडे न बघताच तिथून निघून गेला. त्यांनाही हा मोठा धक्का होता. आरामासाठी त्याला दारू प्यायची गरज आहे असं नाही. पण स्वतःला शांत ठेवण्यासाठी तो वेळ घेतो. दिवसभर तो त्याच्यात विश्वात गुंग असतो”. मिकाने सलमानचा खरा स्वभाव सांगितला.
आणखी वाचा – श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांचा आजार अन्…; ICUमध्ये होती निक्की तांबोळी, मृत्यू जवळून पाहिला आणि…
दारूनंतर बदलता स्वभाव
मिका म्हणाला, “सलमान रात्री काही वेगळाच आणि दिवसा वेगळाच असतो. माझ्याबरोबर अगदी खुलेपणाने तो वावरतो. दोन ड्रिंक्स घेतले की, तो माझ्याबरोबर समानतेने वागतो. पण यामधून चुकीचा अर्थ घेऊ नका. दोन किंवा चार पॅग ड्रिंक्स घेतली तरी तो सलमान खान आहे. लोकांना आयुष्यात गर्व होतो तिथेच सगळं अडतं”. मिकाने सलमानबाबत मोठे दावे केले आहेत.