पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सर्वच स्थरातून या दहशतवादी हल्ल्याविरोधात निदर्शनंही केली जात आहेत. दरम्यान सरकारकडूनही याच पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांना लवकरात लवकर देश सोडण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. तर पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना पुन्हा देशात यायचं असेल त्यांनीही लवकरात लवकर यावे असं सरकारद्वारे बजावण्यात आलं आहे. सरकारच्या या नियमांनंतर पाकिस्तान-भारत बॉर्डरवर, विमानतळावर गर्दी पाहायला मिळाली. काही पाकिस्तानी मंडळींनी संताप व्यक्त केला. अशातच आता राखी सावंतने जुना वाद उकरुन काढला आहे. (rakhi sawant on seema haider)
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत राखीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सीमाला भारतातच राहू द्या असं राखीचं म्हणणं आहे. सीमा भारताची सून आहे असं राखीचं म्हणणं आहे. राखी म्हणाली, “मित्रांनो, सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवू नये. कारण ती भारताची सून आहे. तसेच मित्राची बायको आहे. भारताने तिला पाकिस्तानमध्ये पाठवू नये. ती सचिनवर खूप प्रेम करते. आता ती भारतीयच झाली आहे”.
पुढे ती म्हणाली, “असा अन्याय कोणत्याही स्त्रीवर होऊ नये. ती जर आई झाली नसती तर तुम्ही तिला पाठवू शकत होतात. सीमा हैदरबरोबर तुम्ही काहीच चुकीचं करु शकत नाही. स्त्रियांचा आदर करा. हे कटकारस्थान कोणी रचलं आहे हे माहित नाही. देवालाच सगळं माहिती आहे. पण ज्यांचा काहीच दोष नाही त्यांच्यावर अन्याय करु नका. मुस्लिमनंतर ती आता पूर्णपणे हिंदू झाली आहे”.
सीमा भारताचाच जयजयकार करते असंही राखीचं म्हणणं आहे. २०२३मध्ये सीमा चुकीच्या मार्गाने पाकिस्तानातून भारतात आली होती. तिने ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय सचिन मीनाशी लग्न केलं. त्यानंतर सीमा हैदर हे प्रकरण बरंच गाजलं. सरकारलाही याची दखल घ्यावी लागली. मात्र आता ती देश सोडणार का? हा प्रश्न आहे. तिच्या पाठिशी राखी उभं असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं आहे.