सात दिवसांपूर्वी घरासमोर सजलेला मंडप, नटून-थटून आलेली नववधू आज रंगहीन झाली. तिने फोडलेला टाहो थरकाप उडवणारा आहे. हे सगळं सगळं काही पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेले नौदल अधिकारी विनय नरवाल (vinay narwal) यांच्याबाबत आम्ही बोलत आहोत. फक्त सात दिवसांपूर्वी विनय व हिमांशीने आयुष्यभराची गाठ बांधली. आज हा संसार उघड्यावर आला आहे. विनय यांचं पार्थिव जेव्हा आणण्यात आलं तेव्हा “विनय तुझी आठवण रोज येईल, रोज येईल…” असं म्हणत हिमांशी जोरात ओरडल्या. त्यांचं हे रडणं, ओरडणं हृदय पिळवटून टाकणारं होतं. विनय यांना अखेरचा निरोप देतानाचा व्हिडीओ पाहून देशभरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. (jammu and Kashmir pahalgam terror attack emotional video)
सात दिवसांपूर्वीच झालेलं लग्न
सात दिवसांपूर्वीच लग्न झाल्यानंतर विनय व हिमांशी यांनी फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसाआधी ते हनिमूनसाठी काश्मीरमध्ये पोहोचले. मात्र आयुष्यातील सोनेरी क्षण जगण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांना संपवलं. आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना काय काय विचार त्या माऊलीच्या मनात आले असतील याचा अंदाजही लावणं कठीण. हिमांशी यांच्या प्रत्येक शब्दांमध्ये असणारं दुःख सहन न होणारं आहे.
आणखी वाचा – हाताला काळी पट्टी बांधून १३ दिवस दुःख पाळणार, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा निर्णय, म्हणाल्या, “दिखावा नाही…”
पार्थिवासमोर पत्नीचा आक्रोश
पती विनय यांना अखेरचा निरोप देताना हिमांशी रडत म्हणाल्या, “मला तुमचा नेहमीच अभिमान असणार आहे. तुमची मला रोज आठवण येईल”. तसेच पार्थिवा शेजारी उभं राहिल्यानंतर तिने ‘जय हिंद’ म्हणत आक्रोश केला. हिमांशी यांनी पार्थिवाला कवटाळत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी हिमांशी यांना कुटुंबातील मंडळींनी सावरण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा – “’काश्मीर फाइल्स’ला नावं ठेवली आता तेच झालं”, पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर भडकले, बॉलिवूड कलाकारांचाही संताप
हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal's wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack
— ANI (@ANI) April 23, 2025
The couple got married on April 16. pic.twitter.com/KJpLEeyxfJ
२२ एप्रिलला विनय व हिमांशी हनिमूनसाठी काश्मीरमध्ये पोहोचले. पहलगामध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे ते पत्नीसह भेळ खात उभे होते. यावेळी हल्लेखोराने “तू मुस्लिम आहेस का?” असं विचारलं. त्यावर विनय यांनी नाही असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दोन वर्षांपूर्वीच विनय नौदल अधिकारी म्हणून नोकरीवर रूजू झाले होते. त्यांचं पोस्टिंग कोचीमध्ये होतं. लग्नासाठी त्यांनी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती. विनय यांच्या निधनामुळे कुटुंबीय हतबल झाले आहेत.