Urvashi Rautela Viral Statement : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली. सोशल मिडियावर ही अभिनेत्री नेहमीच सक्रिय असते. ती तिचे हटके, बोल्ड फोटोशूट नेहमीच पोस्ट करताना दिसते. अभिनेत्रीने अलीकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आलेली पाहायला मिळाली. तिच्या नावाचे मंदिर असल्याचा दावा अभिनेत्रीने नुकताच केला आहे. आणि यानंतर सोशल मीडियावर जोरदार गोंधळ उडाला आहे. त्याचवेळी, बद्रीनाथ मंदिराच्या पंडितनेही यावर प्रतिक्रिया देऊन अभिनेत्रीचा जोरदार निषेध केला आहे. समोर आलेल्या मुलाखतीदरम्यान, उर्वशीने दावा केला की तिच्या नावाचे मंदिर आहे. मुलाखत घेणाऱ्याने एक नव्हे दोन ते तीन वेळा याची पुष्टी केली की, खरंच तिच्या नावाचे खरोखरच मंदिर आहे का?. यावर, अभिनेत्रीने वारंवार दावा केला की, लोक तिच्या नावाच्या मंदिरात प्रार्थनाही करतात.
सिद्धार्थ कानन यांना दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी म्हणाली की, “बद्रीनाथजवळ माझ्या नावाने एक मंदिर आहे. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी त्या मंदिरात येतात, माझ्या फोटोला हार घालतात आणि मला ‘दमदमामाई’ म्हणतात. मी हे अत्यंत गंभीरपणे बोलत आहे. यावर बातम्याही आल्या आहेत”, अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. उर्वशी याच मुलाखतीत पुढे म्हणाली की, “गेल्या काही वर्षांमध्ये मी साऊथमध्ये अनेक सिनेमे आणि तेथील अभिनेत्यांबरोबर काम केले. साउथमधील सुपरस्टारच्या नावाने चाहते मंदिरं बांधतात. मग माझ्या चाहत्यांनीही माझे मंदिर का बांधू नये?”.
आणखी वाचा – दुपारी झोपावं की नाही?, तुम्हालाही ही सवय असेल तर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर
उर्वशीच्या या वक्तव्यानंतर स्थानिक पुजारी भडकले
ब्रह्मकपाल तीर्थ पुरोहित संघाचे अध्यक्ष अमित सती म्हणाले की, अभिनेत्री उर्वशी राऊत यांनी केलेल्या निवेदनामुळे स्थानिक रहिवाशांसह हायक्सच्या विश्वासाला दुखापत झाली आहे. त्यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अन्यथा याजक सोसायटी चळवळीस बांधील असेल. बद्रीनाथ धामचे माजी धर्माधिकारी भुवंचंद्र युनियाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की उर्वशी रौतेलाला बद्रीनाथजवळील आई उर्वशी देवीच्या मंदिराला तिच्या नावाने जोडले आहे. बद्रीनाथ धाममधील उर्वशी मंदिराचा उल्लेख शास्त्रवचनांमध्ये आहे आणि त्याची उपासना देवी म्हणून केली जाते.
आणखी वाचा – पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…; जान्हवी कपूरचा मुद्दा योग्यच, तुम्हाला पटला का?
बलदेव मेहता, हककुकधारी मेहता थोकचे सदस्य आणि बामानी गावातील बद्रीनाथ मंदिरातील माजी नगर पंचायतचे अध्यक्ष, या प्रकरणावर असे म्हणाले की, उर्वशी रौतेला ही उत्तराखंडची रहिवासी आहे, त्यांना देव आणि देवदूतांच्या मंदिराचे संपूर्ण ज्ञान आहे. अशा परिस्थितीत, उर्वशी मंदिराबद्दलच्या तिच्या दाव्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे अभिनेत्रीने त्वरित माफी मागावी अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी ठेवली आहे.