Nitin Desai Funeral : अनेक कलाकार हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दिवस रात्री झटत असतात. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याची काही जणांची सतत धडपड सुरु असते. मनोरंजनाची दुनिया अधिकाधिक समृद्ध व्हावी या धेय्याने झपाटलेलं एक नाव होतं ते म्हणजे कला दिग्दर्शक नितीन देसाई. बुधवार(६ ऑगस्ट) रोजी सकाळी नितीन देसाई यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. हिंदी तसेच मराठीमधील अनेक नावाजलेल्या चित्रपटासाठी त्यांनी सेट उभारले होते. लगान, जोधा अकबर, बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, अशा अनेक चित्रपटांच्या यशामागे त्यांचा महत्वाचा वाटा होता.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर देसाई कुटुंबा कडून त्यांच्या अंत्यसंस्कारा बाबत अपडेट देण्यात आली आहे. नितीन यांचे काही कौटुंबिक सदस्य परदेशातून येत आहेत त्यामुळे आज (३ ऑगस्ट) या दिवशी पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता उद्या (४ ऑगस्ट) रोजी नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यापूर्वी मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असं सांगण्यात होतं परंतु नवीन वृत्तानुसार आता एन.डी. स्टुडिओ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलं आहे.
हे देखील वाचा- नितीन देसाईंच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? शवविच्छेदनाचा अहवाल समोर
नितीन देसाई यांनी एन. डी. स्टुडिओमधेच गळफास घेत अखेरचा श्वास घेतला. काही राजकीय नेत्यांकडून आर्थिक तणावामुळे नितीन देसाई यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येतंय. तर पोलिसांच्या माहिती नुसार आणि शवविच्छेदनाच्या अहवाल नुसार गळफास घेत नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि याबद्दल आणखी तपास सुरु आहे असं सांगण्यात आलं आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर राजकीय पटलावरून दुःखद प्रतिक्रिया उमटल्या त्याच बरोबर अनेक कलाकारांनी देखील भावुक होऊन त्यांच्या सोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.(Nitin Desai postmortem report)
अनेक चित्रपटांच्या यशस्वी कामगिरीमागे नितीन देसाई यांचा मोलाचा वाटा होता. नितीन देसाई यांच्या निधनानंतर प्रत्येक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मराठी मधील बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी तर हिंदी मधील लगान, जोधा अकबर अशा अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवाय अमोल कोल्हे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेचं शुटिंग देखील नितीन देसाई यांचा स्टुडिओमधेच पार पडलं होतं. (Nitin Desai death reason)