घर, काम सांभाळत प्रेक्षकांना हसवणं म्हणजे कलाकारांसाठी तारेवरची कसरत. खासगी आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी कलाकाराला कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर त्याचं काम चोख करावं लागतं. कित्येकदा दुःखद प्रसंग असतात. मात्र त्यावर मात करत कलाक्षेत्रातील मंडळींना पुढे जावं लागतं. आता असंच काहीसं ‘पारु’ फेम शरुयू सोनावणेच्या बाबतीत घडत आहे. शरयूचे सासू-सासरे दोघंही सध्या रुग्णालयात भरती आहेत. आजारपणामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील व्हिडीओ शरयूचा पती जयंत लाडेने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. पण नक्की काय झालं? याबाबत त्याने सविस्तर माहितीही दिली आहे. (Marathi actress sharayu sonawane personal life)
सासू-सासऱ्यांचे रुग्णालयातील फोटो
जयंतने रुग्णालयात गेल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. व्हिडीओमध्ये आई व वडील बेडवर झोपले असल्याचं दिसत आहे. वडिलांवर औषधोपचार सुरु आहेत. तर आईही आजारपणामधून हळूहळू बाहेर येत आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “लवकर बरे व्हा. आई-बाबा लवकरात लवकर तुम्हाला बरं वाटू दे”. जयंतने व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप करणं सावत्र मुलीला महागात, व्हिडीओद्वारे म्हणाली, “सत्य समोर आलं आणि…”
नक्की आजारपण काय?
आई-बाबांना नक्की काय झालं? असा प्रश्न कमेंट्सद्वारे अनेकांनी विचारला. तेव्हा कमेंटमधूनच जयंतने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तो म्हणाला, “तुम्ही दिलेल्या आशिर्वादांबाबत मी तुमचा ऋणी आहे. आता सगळं काही ठीक आहे. अल्सरशी संबंधित आजार होता. पण आता सगळं नियंत्रणात आहे. तुम्ही दिलेला पाठिंबा खरंच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे”. जयंत आपल्या आई-वडिलांची योग्य ती काळजी घेत आहे. तर दुसरीकडे शरयू चित्रीकरणात व्यग्र आहे. तिच्यासाठी हा काळ अगदी कठीण आहे.
आणखी वाचा – हवे तेवढे पैसे घेऊनही शाहरुख खानच्या बायकोच्या रेस्टॉरंटमध्ये बनवाट पनीर, धक्कादायक Video समोर
मध्यंतरी ITSMAJJA ला दिलेल्या मुलाखतीत शरयूने सासूबाईंविषयी भाष्य केलं होतं. तिने म्हटलं होतं की, “माझ्या सासूबाईंनी मला डबा बनवून दिला. चित्रीकरणानिमित्त पुण्यात माझी ये-जा सुरु असते. दरम्यान रोज सासूबाई माझ्यासाठी छान जेवण बनवतात. काय हवं काय नको हेही बघतात”. शरयूच्या बोलण्यावरुनच तिचं सासूबाईंशी किती सुंदर नातं आहे हे दिसून येतं.