शाहरुख खानची पत्नी गौरी खानने वांद्रे सारख्या परिसरात स्वतःचं रेस्टॉरंट सुरु केलं. ‘तोरी’ असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. इथे अनेक नामांकित व्यक्ती येतात. विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र आता तोरी चांगलंच अडचणीत आलं आहे. गौरीच्या रेस्टॉरंटमध्ये भेसळयुक्त पनीर वापरण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. सार्थक सचदेवा नावाच्या युट्युबरने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. तो या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. यावेळी सार्थकने तोरीमध्ये असलेल्या भेसळयुक्त पनीरबाबत सांगितलं. पण हे नक्की प्रकरण काय? याबाबत तोरी रेस्टॉरंटने दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत सविस्तर जाणून घेऊया. (shahrukh khan restaurant)
तोरी रेस्टॉरंट स्टार्चचा वापर करत पनीर बनवत असल्याचं युट्युबरने म्हटलं आहे. शिवाय भेसळयुक्त पनीर दाखवून देण्यासाठी तिथे त्याने एक आयोडिन टेस्टही केली. जर पनीरमध्ये स्टार्च असेल तर आयोडिन टेस्टच्या आधारे ते काळं किंवा निळं होतं. युट्युबरने ही टेस्ट केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान त्याने हे सत्य उघडकीस आणण्याचं ठरवलं.
आणखी वाचा – “लोक अक्कल शिकवतील की…”, लेकाचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, शिक्षिकेसाठी पत्र अन्…
युट्युबर म्हणाला, “ शाहरुख खानच्या रेस्टॉरंटमध्ये पनीर नकली आहे. ते दृश्य पाहून मला आश्चर्यच वाटलं”. इतकंच नव्हे तर युट्युबरने आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणली. त्याने मुंबईतील सेलिब्रिटी व्यक्तींच्या रेस्टॉरंटचा दौरा केला. शिल्पा शेट्टीचं बॅस्टियन, विराट कोहलीचं वन८ कम्युन, बॉबी देओलचं समप्लेस एल्समध्येही भेसळयुक्त पनीरचा वापर करत असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं.
आणखी वाचा – “बाबा वाट बघतोय या हट्ट नाही करणार”, शहीद वडिलांना लेकाचं भावनिक पत्र, व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी
संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर तोरीनेही या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. पनीर भेसळयुक्त नसल्याचं त्यांनी म्हटलं. पनीरमध्ये सोया संबंधित काही पदार्थ मिश्रित असल्यामुळे पनीरचा रंग बदलला असं रेस्टॉरंटचं म्हणणं आहे. तोरीमध्ये काही भेसळयुक्त नसतं असंही गौरी खानच्या टीमने सांगितलं. नभारत टाइम्सच्या वृत्तानुसार डॉ. किरण सोनी यांनी सांगितलं की, “आयोडिन टेस्टमुळे स्टार्च आहे की नाही याबाबत माहिती मिळते. पण यामुळे पनीर पूर्णपणे भेसळयुक्त आहे असा दावा आपण करु शकत नाही”. आता खरंच या महागड्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थ भेसळयुक्त असतात का? यावर प्रश्नचिन्हच आहे.