पाळीव प्राणी व माणसांचं नातं खूप जुनं आहे. गावाकडे गाय, म्हैस, बैल यांचा सांभाळ आवडीने करतात. काही जनावरं शेतातही राबतात. त्यांना राहण्यासाठी गावाकडे एक वेगळी जागा तयार केली जाते. तिथे त्यांचं पालन-पोषण होतं. माणसं अगदी त्यांना एखाद्या जिवलगाप्रमाणे माया लावतात. या सगळ्या प्राण्यांमध्ये महत्त्वपूर्ण प्राणी म्हणजे श्वान (कुत्रा). अलिकडे शहरात श्वान पाळण्याचं प्रमाण वाढलं आहे. विविध जातींचे श्वान घरात पाळले जातात. त्यांच्या आवडी-निवडी जोपासल्या जातात. श्वान प्रत्येकाच्या घरातील एक आवडता व्यक्तीच होऊन जातो. पण घरात श्वान पाळणं खरंच योग्य आहे का? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (pet dogs at home)
श्वान म्हणजे घराची राखण करणारा प्राणी असं म्हटलं जायचं. त्यानुसारच बराच काळ पूर्वी माणसं श्वानाला घराची राखण करण्यासाठी ठेवायचे. पण बदलत्या काळानुसार माणसांनी श्वानाला घरात जागा दिली. लहान मुलांनाही त्याचं आकर्षण वाटू लागलं. आता बऱ्याच घरांमध्ये हमखास श्वानाचं दर्शन घडतं. पण घरात प्राणी पाळणं हजारो वर्षांपूर्वीपासूनच सुरु झालेली परंपरा आहे.
आणखी वाचा – “‘छावा’ वाईट चित्रपट, सोयराबाई परपुरुषासमोर…”, आस्ताद काळेचं मोठं विधान, स्वतः चित्रपटात काम करुनही…
काही रिपोर्टनुसार श्वान हा खूप जुना पाळीव प्राणी आहे. २०१६मधील ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या अहवालानुसार श्वान हा १५ ते १६ हजार वर्षांपूर्वीचा पाळीव प्राणी आहे. पण त्याचं घरात महत्त्व किती? आणि श्वानाचं घरात राहणं योग्य आहे का? याबाबत विविध गोष्टी कानावर येतात. श्वानप्रेमींसाठी खास प्रेमानंद महाराजांनी खूप छान समजावून सांगितलं आहे.
आणखी वाचा – गडकिल्ल्यांवर पार्ट्या, दारु पिणं तुम्हाला शोभतं का?, जागीच फटकवणार कारण…
प्रेमानंद महाराज पाळीव श्वानाबाबत म्हणाले, “आपण घरात कुत्रा पाळत आहोत. त्याच्यावर खूप प्रेम करतो, त्याला माया लावतो. हे सगळं केलंच पाहिजे. त्याला आमचा नकार कधीच नाही. पृथ्वीवर असलेला प्रत्येक अंश देवाचाच आहे. पृथ्वीवर जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. त्यानुसार सगळ्यांना प्रेम मिळालंच पाहिजे. मग तो गाढव असला तरी त्याला प्रेम मिळायला हवं. पण ते त्याच्या त्याच्या स्थितीनुसार असलं पाहिजे”.
“पाळीव कुत्र्याला जेवण द्या. काही आजार असेल तर त्याला औषध करा. पण त्याला स्वयंपाकघरात आणणं बरोबर नाही. आम्ही बघतो की, पाळीव कुत्रा घरातील लोकांच्या जवळ येतो, अंगावर असतो हे बरोबर नाही. सगळ्यामध्ये देव आहे त्याबाबत आमचं दुमत नाही. पण देवाने काही वेगळी व्यवस्थाही त्यांच्यासाठी केलेली आहे. त्यानुसार तुम्ही सगळं फॉलो केलं पाहिजे”. प्रेमानंद महाराज यांनी अगदी सुंदररित्या पाळीव श्वानाबाबत समजावून सांगितलं.