Nitin Desai Funeral : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचं बुधवार (२ ऑगस्ट) रोजी एन. डी. स्टुडिओ येथे निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली. एन. डी. स्टुडिओ येथे त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह जे.जे. रूग्णालय मुंबई येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. जे. .जे रुग्णालयातून शिवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक माहिती नुसार गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. या संबंधित संपूर्ण माहिती घेण्याचं काम डॉक्टर करत आहेत असं देखील या अहवालात सांगण्यात आलं आहे. नितीन देसाई यांच्या मृत्यू समयी एन.डी. स्टुडिओ येथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब देखील पोलिसांनी नोंद करून घेतले आहेत.(Nitin Desai Postmortem Report)
रायगड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यावेळी घटनेचा तपशील सादर करत म्हणाले, “नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले आहे की त्यांचे अंतिम संस्कार एनडी स्टुडिओमध्ये होणार आहेत.” अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. ते पुढे म्हणाले की, आमचा अजून तपास सुरू आहे, “आम्हाला त्या ठिकाणी सापडलेला मोबाइल फोन आणि इतर सामग्री आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत आणि त्या संबंधित योग्य तो तपास सुरु आहे. आम्ही नितीन देसाई यांच्या केअरटेकर आणि ड्रायव्हरचे जबाब देखील नोंद करून घेतले असून तपास करत आहोत.”(Nitin Desai death reason)

तत्पूर्वी नितीन देसाई यांच्या आत्महत्ये प्रकरणी आमदार महेश बलादी यांनी महत्वपूर्ण विधान केलं होत बलादी म्हणाले ” प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई हे आर्थिक तणावाखाली होते त्यामुळे त्यांची हा टोकाचा निर्णय घेतला असावा.” नितीन देसाई यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, अशा अनके कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोबतच राजकीय स्तरातून देखील नितीन देसाई यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.(nitin desai family)
हे देखील वाचा- “जीवनाचा अत्यंत सुंदर सेट उद्ध्वस्त केलास मित्रा”, नितीन देसाईंच्या निधनानंतर राजकीय मंडळीही हळहळली
नितीन देसाई यांनी उभारलेल्या एन. डी. स्टुडिओमध्ये अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचं तसेच मालिकांचं देखील शुटिंग करण्यात आलं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, यांसारख्या अनेक चित्रपटांचं कला दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केले होते. विशेष म्हणजे बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांसाठी सुद्दा त्यांनी सेट उभारले होते. चित्रपटांसोबतच मालिकांचं शूटिंग सुद्धा एन. डी. स्टुडिओ केलं जात होतं.(nitin desai art director)