Hina Khan Grab Attention : आजारपण आणि त्या ओढवलेल्या आजारपणातून पुन्हा तितक्याच ताकदीने उभं राहणं काही सोप्प नाही. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री हिना खान. स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत पुन्हा कामावर परतल्याने हिना खानचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. किमो थेरपीदरम्यानही हिना काही शांत बसली नाही, तेव्हाही ती कामानिमित्त बरेचदा स्पॉट होताना दिसली. जून २०२४ मध्ये हिना खानला स्टेज ३ स्तनाचा कर्करोग आढळला आणि आता ती खर्या योद्धाप्रमाणे कर्करोगाचा धैर्याने लढा देत आहे. काम करता करता शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीसह आपले उपचार तिने चालू ठेवले आहेत. त्यामुळे आता उत्तम लढवय्या म्हणून हिना खानकडे पाहिलं जातं.
अभिनेत्री हिना खान नुकतीच एका फॅशन शोमध्ये डिझायनर कियोसाठी शोस्टॉपर बनली आणि ती तिच्या आत्मविश्वासाने आणि शैलीने धावपट्टीवर गेली. यावेळी तिने पूर्ण-स्लीव्ह जॅकेट आणि लांब फ्लॉई ब्लॅक स्कर्ट असा लूक केला होता. तिच्या रॅम्प वॉकचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रॅम्पवर चालत असताना, ती काही काळ अडखळली, परंतु लगेचच तिने स्वतःला सावरलं आणि आत्मविश्वासाने चालण्यास सुरुवात केली. यावेळीच्या तिच्या चालीने चाहत्यांची मन जिंकली.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने वर्षभराने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, नावही ठेवलं खूपच खास, पाहा Video
‘इन्स्टंट बॉलिवूड’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, हिना खान सुंदर कपड्यांमध्ये रॅम्प वॉकवर दिसली. रॅम्पवर चालत असताना, हिना काही काळ अडखळताना दिसली आणि ती चालताना एकदा नव्हे तर दोनदा अडखळली. पण ती थांबली नाही आणि पटकन स्वत: ला सांभाळत, सावरत पुन्हा रॅम्पवर चालण्यास सुरवात केली. रॅम्प वॉकमध्ये तिच्या या क्रियेचे चाहते कौतुक करीत आहेत. या सर्व प्रकारादरम्यान अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील हास्यात तसूभरही कमतरता जाणवली नाही. व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका चाहत्याने म्हटले की, “तिने ती सभ्यता हाताळली”. तर दुसर्याने लिहिले, “या परिस्थितीनंतर हिना खान कडून काय काय शिकायचं”.
आणखी वाचा – बायकोचं गोविंदाबरोबर जमेना, प्रश्न विचारताच दिलं विचित्र उत्तर, नातं घटस्फोटापर्यंत येणार कारण…
काही आठवड्यांपूर्वी, अभिनेत्रीने तिच्या नखांचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यास ‘केमोथेरपीचा साइड इफेक्ट’ असे म्हटले. हिनाचे काळे आणि ठिसूळ नखे तिच्या शरीरावर केमोथेरपीचा कितपत परिणाम झाला हे स्पष्टपणे दर्शवित होते, तेव्हापासून तिचे चाहते हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. हिना अलीकडेच ‘गृह लक्ष्मी’ या वेब मालिकेत दिसली. शोमध्ये, हिना सामान्य गृहिणीची भूमिका साकारत आहे.