Prathamesh Parab And His Wife Video : मराठी सिनेविश्वातील नेहमीच चर्चेत असणार कपल म्हणजे प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं यानिमित्त या जोडप्याने परदेशवारी केली. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. आता लग्नाचा पहिला वाढदिवस दोघेही थायलंडमध्ये साजरा करताना दिसत आहेत. त्यांचा शाही आणि मराठमोळ्या लग्नसोहळ्याचे या अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अनेकदा ही जोडी इव्हेंट्समध्ये स्पॉट होताना दिसली.
‘अशी ही जमवाजवी’ या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगमध्येही प्रथमेशने क्षितीजासह हजेरी लावली होती. यावेळी दोघांचा कुल असा अंदाज पाहायला मिळाला. अनेकांच्या भेटीही यावेळी झाल्या. प्रथमेश व क्षितीजा यांनी या स्क्रिनिंगच्या दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचीही भेट घेतली. त्यांना नमस्कार करत आशीर्वादही घेतला. दरम्यान यावेळी निवेदिता आणि अशोक यांनी त्यांच्या मिश्किल स्वभावाने प्रथमेश आणि क्षितीजा यांची शाळा घेतली. याचा व्हिडीओ प्रथमेशने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – सैफ अली खान हल्ल्याप्रकरणात मोठी बातमी, आरोपी शरीफुलबाबत महत्त्वाचे पुरावे हाती, नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये, “बालविवाह दिसतोय की नाही बालविवाह”, असं निवेदिता सराफ प्रथमेश आणि क्षितीजाला अशोक सराफांपुढे उभे करत गमतीत म्हणताना दिसत आहेत. यावर प्रथमेश आणि क्षितीजाही हसताना दिसत आहेत. त्यावर अशोक सराफ गमतीत त्यांना विचारत आहेत, “म्हणून विचारत आहे कोणत्या शाळेत आहात?”. तेव्हा निवेदिता ताई दोघांना धरुन असं गमतीत सांगत आहेत की, “१८ आणि २१ वय झाल्याशिवाय लग्न करता येत नाही”.
आणखी वाचा – कुणाल कामराला ‘बिग बॉस’ची ऑफर, शोमध्ये एन्ट्री करण्यावरुन म्हणाला, “या शोमध्ये जाताना…”
लग्नानंतर प्रथमेश व क्षितिजा बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना वेळ देताना दिसतात. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात. क्षितिजाही नवऱ्याचं कौतुक करत अनेकदा पोस्ट शेअर करताना दिसते. प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये सध्या ती कार्यरत आहे.