Monika Dabhade Maternity : ‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मोनिका दाभाडे काही दिवसांपूर्वीच आई झाली. १५ मार्चला मोनिकाने चिमुकलीला जन्म दिला. सोशल मिडियावर बाळाबरोबरचा पहिला फोटो शेअर करत तिने चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. लेकीच्या येण्याने मोनिका आणि तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. “दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो… गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो… आणि नवे पर्व सुरू १५.०३.२०२५” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त करत लेक झाल्याची गुडन्यूज दिली. मोनिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अगदी डिलिव्हरीला जाईपर्यंत ती फ्रेश दिसत होती आणि तिचा vlog बनावट होती. या प्रवासाचाही सुंदर असा व्हिडीओ मोनिकाने तिच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये डिलिव्हरीला हॉस्पिटलमध्ये जाताना ते अगदी सुरळीत डिलिव्हरी होऊन लेकीसह घरी परतताना ती दिसली. घरी आल्यानंतरही अगदी जोरदार स्वागत त्यांचं झालेलं पाहायला मिळाले हे पाहून मोनिका खूप खुश झाली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असं समोर आलं की, १५ मार्चला मोनिकाच्या डिलिव्हरीची तारीख होती, आणि त्यावेळेस ती घरातून निघताना दिसली. घरातून निघण्यापूर्वी मोनिकाने हा व्हिडीओ तयार केला. यांत मोनिका खूप खुश दिसत होती. या शुभ कार्याला घरातून निघण्यापूर्वी तिने दिवाबत्ती करत देवाचे आशीर्वाद घेतले आणि सगळं काही सांभाळून घेण्यास सांगितले. डिलिव्हरीला जाताना पाणी पिण्यास तिला मनाई होती म्हणून तिचं तोंड काहीस कोरडं पडलं होतं.
डिलिव्हरीला घरातून निघाल्यावर मोनिकाने सर्वात आधी इच्छापूर्ती हनुमान मंदिराला भेट दिली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ती हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलला पोहोचल्यावर काही फॉर्मॅलिटी पूर्ण करुन ती आत गेली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मोनिकाच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही तर खूप आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. मोनिकाला एक दिवस हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. आणि अखेर मोनिकाला मुलगी झाली. डोहाळ जेवणालाही मोनिकाने पेढा आणि बर्फीमध्ये बर्फीचीच निवड केली. यावेळी मोनिकाची काळजी घ्यायला तिचे कुटुंबीय उपस्थित होते. लेक होताच मोनिकाच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहताना दिसला. यावेळी मोनिका आणि तिच्या नवऱ्याने लेकीचा चेहरा जन्मल्या जन्मल्याच न दखवण्याचंही ठरवलं.
डिस्चार्जनंतर ते घरी आली तेव्हा त्यांच्या राहत्या बिल्डिंगचे वॉचमेन काकाही त्या चिमुरडीच्या स्वागतासाठी हजर होते. त्यांचाही चेहऱ्यावर तितकाच आनंद ओसंडून वाहत होता. गुडिया राणी, छकुली बाई अशी हाक मारत ते नात आल्याचा आनंद लुटत होते. फुलांच्या पायघड्यांवरुन मोनिका आणि तिच्या लेकीचं घरात स्वागत केलं. सुंदर असं बलून्सच डेकोरेशनही स्वागतासाठी सज्ज होतं. इतकंच नाहीतर औक्षण करत त्यांनी चिमुकलीच दणक्यात स्वागत केलं. आयुष्यभर लक्षात राहणारा हा अनुभव असल्याचंही मोनिकाने व्हिडीओच्या शेवटी म्हटलं.