Jacqueline Fernandez Mother Death News : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे रविवार (६ एप्रिल)ला निधन झाले. त्याच्या आईला काही दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, किम यांना हृदयाचा स्ट्रोक झाला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जॅकलिनच्या आईच्यानिधनाची वाईट बातमी मिळताच तिने ताबडतोब शूटिंग सोडले आणि ती भारतात परतली. यानंतर ती तिच्या वडिलांसह आईला भेटण्यासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात पोहोचली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस तिच्या आईच्या निधनाने भावुक झालेली दिसली.
जॅकलिनच्या आईच्या निधनानंतर सिनेविश्वातील अनेक लोकही तिला पाठिंबा देण्यासाठी अंत्यसंस्काराला उपस्थित होते. अभिनेत्रीप्रमाणेच तिच्या वडिलांनाही रडू आवरेना झाले. जॅकलिनचे वडिल पत्नीच्या निधनाने खचलेले दिसले. अंत्यसंस्कारावरुन चालत येताना त्यांच्या पायातील त्राण गेला आणि ते पायऱ्यांवर गडबडताना दिसले. हा व्हिडीओ पाहून, चाहतेही मनापासून दु: खी झाले आणि ते जॅकलिन आणि तिच्या वडिलांना या कठीण काळात आधार देताना दिसले.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एलरॉय फर्नांडिस अत्यंत भावनिक दिसले. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा सुरु होत्या. पत्नीचे अंतिम संस्कार केल्यानंतर, ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक जॅकलीन फर्नांडिसच्या वडिलांची काळजी घेताना त्यांचा हात धरुन आधार देत त्यांना गाडीपर्यंत घेऊन जाताना दिसत आहेत.
आणखी वाचा – महिला चाहतीवर रागावल्या जया बच्चन, हातही झिडकारला अन्…; नेटकऱ्यांना खटकलं, म्हणाले, “हिला सहन…”
माध्यमांच्या वृत्तानुसार, जॅकलिनची आई किम फर्नांडिस यांना २४ मार्च रोजी हृदयाचा स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना लिलावती हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. यावेळी, जॅकलिन तिच्या आईची काळजी घेण्यासाठी अनेकदा रुग्णालयात भेट देताना दिसली. वृत्तानुसार, जॅकलिनला यावर्षी आयपीएलमध्ये कामगिरी करण्याची संधी मिळाली परंतु आईचे आरोग्य पाहता तिने नकार दिला. २०२२ मध्येही जॅकलिनची आई किम यांना हृदयाचा स्ट्रोक आला होता.