मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्यांदाच सिक्कीममध्ये शूट झाला मराठी चित्रपट, ‘बंजारा’साठी शरद पोंक्षेंच्या लेकाची कमाल, धमाल-मस्ती अन् बरंच काही

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 1, 2025 | 3:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Banjara Movie Shooting

पहिल्यांदाच सिक्कीममध्ये शूट झाला मराठी चित्रपट, 'बंजारा'साठी शरद पोंक्षेंच्या लेकाची कमाल, धमाल-मस्ती अन् बरंच काही

Banjara Movie Shooting : परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. आजवर असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी परदेशात जात चित्रीकरण केलं आहे. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण आहे जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीम मध्ये झाले आहे.

यापूर्वी ‘बंजारा’ चित्रपटाचे पोस्टर, टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटले असेल. हे पडद्यावर जितके सहज, सुंदर दिसत असले तरी या ठिकाणी चित्रीकरण करणे, हे प्रचंड आव्हानात्मक होते. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे.

आणखी वाचा – चार बायपास सर्जरी, हृदयविकारामुळे जगणंही झालेलं कठीण; सुप्रसिद्ध अभिनेत्यावर होती वाईट वेळ, मृत्यूच्या दारातून परतला तेव्हा…

View this post on Instagram

A post shared by Sneh Sharad Ponkshe (@snehponkshe)

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ” हे एक असे चित्रीकरण स्थळ आहे, जिथे आजवर कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही. ही जागाच अशी आहे, की कोणालाही प्रेमात पाडेल. आम्ही सुमारे १४, ८०० फूट उंचीवर चित्रीकरण केले आहे, जिथे खूप कमी ऑक्सिजन होता. आम्ही अक्षरशः ऑक्सिजन स्प्रे व कपूर वापरत होतो. एकतर हवामानाचा काहीच अंदाज नाही. क्षणात उजाडलेले असायचे तर क्षणात पाऊस यायचा. आमचे नऊ दिवसांचे शेड्यूल होते आणि या काळात बराच पाऊस पडला. शेड्यूल बदलू शकत नसल्याने कसंबसं शूटिंग पूर्ण केले. सुमारे दीडशेची टीम घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथली जवळपास शंभरच्यावर लोकं होती. अशा सगळ्यांना सेटवर घेऊन आम्ही त्या अनपेक्षित हवामानात चित्रीकरण पूर्ण केले. या सगळ्यासाठी आम्हाला इंडियन आर्मीचे खूप सहकार्य लाभले.”

आणखी वाचा – Video : डोळ्याला पट्टी, थकलेला चेहरा अन्…; ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांची झालेली अवस्था पाहून सगळेच हैराण, नक्की झालं काय?

मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन स्नेह पोंक्षे यानेच केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Tags: Banjara MovieBanjara Movie Shootingmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hera Pheri 3
Entertainment

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींची नोटीस, ‘हेरा फेरी ३’मध्येच सोडल्याने वाद पेटला

मे 20, 2025 | 5:11 pm
Mumbai corona cases
Lifestyle

महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढली, नवा आजार आणखी धोकादायक, लक्षणं काय?

मे 20, 2025 | 4:37 pm
Abhijeet sawant accident case
Entertainment

लोक मारायला जमले, दारू प्यायला आहे ओरडले अन्…; अपघात प्रकरणात अडकलेला अभिजीत सावंत, पोलिस स्टेशनमध्ये बसून…

मे 20, 2025 | 3:27 pm
Crime Latest News
Women

आईच्या बॉयफ्रेंडकडून अडीच वर्षाच्या लेकीवर बलात्कार, जन्मदाती उभं राहून बघत बसली अन्…; वेदनेने चिमुकलीचा मृत्यू

मे 20, 2025 | 1:31 pm
Next Post
Kunal Kamra News

"लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या करुन…", कुणाल कामराची नवी संतापजनक पोस्ट, पैसे कमावण्याचेही मार्ग बंद झाल्यानंतर…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.