शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांनीच प्रेम केलं, रागवतील आणि…”, सततच्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकर अखेर बोलला, म्हणाला, “आतापर्यंत कौतुक करुन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2025 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Santosh Juvekar On Trolling

“त्यांनीच प्रेम केलं, रागवतील आणि…”, सततच्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकर अखेर बोलला, म्हणाला, “आतापर्यंत कौतुक करुन…”

Santosh Juvekar On Trolling : ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांनी ही कलाकृती डोक्यावर उचलून धरली. विकी कौशलचं काम पाहून तर सगळेच भारावून गेले. त्याचबरोबरीने चित्रपटातील इतर कलाकारांचीही तितकीच वाहवाह झाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे संतोष जुवेकर. त्याने या चित्रपटात रायाजी मालगे ही भूमिका साकारली. संतोषच्या कामाचंही भरभरुन कौतुक झालं. तोही या भूमिकेबाबत तसेच चित्रपटाविषयी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त झाला. पण घडलं काही भलतंच. संतोषने त्याची विकीशी असलेली मैत्री याबाबत भाष्य केलं. अक्षय खन्नाबरोबरचा किस्सा सांगितला. मात्र त्याचं बोलणं ऐकून संतोषला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. याबाबतच त्याने आता भाष्य केलं आहे. (Marathi Actor Santosh Juvekar)

शेलार मामा फाऊंडेशन ‘चिरायु’ हा कार्यक्रम गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संतोषने हजेरी लावली होती. दरम्यान ITSMAJJA शी संतोषने संवाद साधला. यावेळी त्याला ट्रोलिंगबाबत विचारण्यात आलं. संतोषने अगदी शांतपणे दिलेलं उत्तर खरंच कौतुकास्पद आहे. त्याने प्रेक्षकांवर न रागवता सकारात्मक उत्तर दिलं. तसेच प्रेक्षकांना मायबाप म्हणत आपलं मत व्यक्त केलं.

ट्रोलिंगबाबत काय म्हणाला संतोष जुवेकर?

View this post on Instagram

A post shared by Juvekar Santosh (@santoshjuvekar12)

संतोष म्हणाला, “प्रेक्षकांना आम्ही मायबाप प्रेक्षक म्हणतो. मायबाप म्हटल्यानंतर जसे आपले आई-वडील आपल्यावर चिडतात, धपाटे घालतात तसंच आहे. मायबाप बोलतोय तर त्यांनी खूप प्रेम केलं आहे. खुशही झाले आहेत. मायबाप आहेत तर त्यांचा राग पुन्हा कमी होईल. पुन्हा मला पदरात घेतील याची खात्री आहे. कारण मी त्यांचा खूप आवडता लेक आहे. आतापर्यंत माझ्या कामाचं त्यांनीच कौतुक केलं आहे. त्यांच्या मिळालेल्या कौतुकामुळेच आज मी उभा आहे”.

मराठी कलाकारांकडून मिळाणाऱ्या पाठिंब्याबाबत काय म्हणाला?

सोशल मीडयावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे संतोषचे कलाविश्वातील मित्रही हैराण झाले. अवधूत गुप्ते, सुशांत शेलार सारख्या मंडळींनी संतोषची बाजू मांडली. याचबाबत संतोषला विचारलं असता तो म्हणाला, “मी अजिबात त्यांचे आभार मानणार नाही. कारण आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. त्यांचे उपकार मानायचे नसतात. आणि मला त्यांना परकं करायचं नाहीये. त्यामुळे जसं माझ्या पाठीशी कायम उभे आहात तसेच कायम उभे राहा. एवढाच मी तुमच्याकडे हट्ट करेन. देवाकडे मी प्रार्थना करेन की कायम माझ्यापाठी माझ्या जवळची मंडळी उभी असूदेत”. संतोषने ट्रोलिंगकडेही सकारात्मकरित्या पाहण्याचं ठरवलं आहे.

Tags: marathi actorsantosh juvekarSantosh Juvekar On Trolling
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dowry case in Solapur
Social

काठी-रॉडने मारहाण, कानाचा पडदाही फाटला अन्…; वैष्णवीनंतर सोलापूरात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र हादरला

मे 24, 2025 | 10:01 am
Dipika Kakar  Health Update
Entertainment

ताप नियंत्रणात तरी शस्त्रक्रिया लांबणीवर; दीपिका कक्करची तब्येत आता कशी?, नवरा शोएब म्हणाला, “आता तिला…”

मे 24, 2025 | 9:23 am
Viral Video
Lifestyle

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 24, 2025 | 9:13 am
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Next Post
Titeeksha Tawade and Siddharth Bodke

सासूबाई मैत्रीणच, सासऱ्यांकडून लाड, नाशिकला सासरी गेल्यावर…; तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडकेचं निस्वार्थी प्रेम, इंडस्ट्रीत असूनही…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.