camphor Uses At Home : घरामध्ये शांती व सकारात्मक वातावरण राहण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. आपल्या शास्त्रांमध्येही अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या घरातील सकारात्मकतेसाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या आजूबाजूचे वातावरण खराब असेल तर वास्तुशास्त्राविषयी काही खास गोष्टी सांगितल्या जातात. याच गोष्टी अमलात आणून घर प्रसन्न ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. अनेक वास्तु उपाय आहेत, जे घरासाठी फायदेशीर ठरतात. विशेष उपायांपैकी एक म्हणजे कापूर उपाय. हे असे साहित्य आहे जे घराचे वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते. असंही म्हटलं जातं की, जर घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला गेला तर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. कारण कापूरमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असतात आणि त्याचा आपल्या जीवनावरही प्रभाव पडतो.
शास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनात फायदा होतो. घरात कोणत्या ठिकाणी तुम्ही कापूर ठेवता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पूजेसाठी कापूर वापरला जातो. जर तुमच्या घरात वास्तु दोष असेल तर तुम्ही कापूरच्या मदतीने मुक्ताता मिळवू शकता. यासाठी घराच्या कोणत्याही दोन कोपऱ्यात प्रत्येकी एक कापूर ठेवा. हा कापूर काही दिवसांनी वितळला की त्याच्या जागी दुसरा कापूर ठेवा. असे केल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळू शकते. हा उपाय तुम्ही घरी आणि ऑफिसमध्येही अवलंबू शकता. बेडरूममध्ये कापूर ठेवल्यास मानसिक तणावापासून आराम मिळू शकतो. जर तुम्ही आर्थिक परिस्थितीशी झुंजत असाल तर यावर एक उपाय म्हणजे कापूरचा छोटा तुकडा तिजोरीत ठेवू शकता. यामुळे संपत्तीची शक्यता अबाधित राहते. विनाकारण पैसा खर्च होत नाही. जरी तुम्ही तुमच्या खिशात कापूरचा तुकडा ठेवला तरी ते तुमच्या धनात भर घालते.
आणखी वाचा – तो परत येतोय! ‘देवमाणूस’ मालिकेचा तिसरा भाग येणार, थ्रिलर प्रोमोने वेधलं लक्ष, किरण गायकवाडच असणार का?
सकाळी आंघोळ केल्यानंतर गुलाबाच्या फुलामध्ये कापूरचा तुकडा ठेवा. यानंतर संध्याकाळी कापूरचा तुकडा जाळून दुर्गादेवीच्या चरणी गुलाबाचे फूल अर्पण करावे. यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात समृद्धी येईल. वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात कापूरचा तुकडा ठेवल्यास ते अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. यामुळे सकारात्मक वातावरण राहते. तुमच्या घराचे प्रवेशद्वार असेल तेथे नेहमी कापूर वापरावा कारण तेथून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा प्रवेश करतात. या ठिकाणी कापूरचा तुकडा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. फक्त सकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करेल. वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजास्थानी कापूर ठेवणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. कारण हे स्थान संपूर्ण घरासाठी उर्जेचे केंद्र आहे.
आणखी वाचा – “चांगल्या-वाईट आठवणी…” ‘अप्पी आमची…’ मालिका संपताच अर्जुन भावुक, म्हणाला, “एकदा संपलं की…”
शयनकक्ष ही अशी जागा आहे जिथे शांतता आणि ताजेपणा कायम टिकून असला पाहिजे. या ठिकाणी कापूरचा तुकडा ठेवल्यास मानसिक शांती राहण्यास मदत होते आणि चांगली झोपही येते. त्याचा सुगंध सकारात्मक वातावरणास प्रोत्साहन देतो. मुख्य म्हणजे जर तुम्ही विवाहित जोडप्याच्या बेडरूममध्ये कापूर ठेवला तर ते त्यांचे नाते मजबूत ठेवण्यास अधिक मदत मिळते.