Vishakha Subhedar Shared Goodnews : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले. विशाखा या अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्येही विविध प्रकारच्या भूमिका सकारताना दिसतात. सध्या त्या ‘शुभविवाह’ या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये त्या खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहेत. सोशल मीडियावरदेखील त्या अधिक सक्रिय असलेल्या दिसून येतात. खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. बरेचदा त्या न पटलेल्या मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करताना दिसतात.
अशातच विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. विशाखा यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीसह नवीन गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांसह सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. नॅनो गाडीपासून सुरु झालेला हा अभिनेत्रीचा प्रवास आता मोठ्या आलिशान गाडीपर्यंत येऊन पोहोचला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये नवीन गाडी खरेदी करताना विशाखा सुभेदारचे पतीसुद्धा उपस्थित होते. या जोडप्याने कारची पूजा करुन त्यांच्या नव्या सदस्याचं आनंदाने स्वागत केलं आहे.
पोस्ट शेअर करत विशाखा यांनी म्हटलं आहे की, “आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य. अगदी Nexon पाहावी अशी… नवी गाडी घेतल्याचा आनंद तर आहेच. विशेष म्हणजे यंदाही ‘टाटा’ची गाडी घेतली. सगळ्यात पहिल्यांदा नॅनो मग, पुन्हा एक नॅनो आणि आता ही दुसरी Nexon. माझ्या आधीच्या Nexon गाडीला जुळी बहीण आली. माझं ‘टाटा’चं वेडच म्हणा, पण येणाऱ्या प्रत्येक गाडीबरोबर प्रगती झाली. ती अशीच होत राहो.. माझी आधीची गाडी, माझी सखी, मी तुला खूप मिस करेन असं मी म्हणणारच नाही. कारण, तू तर माझ्यापाशी आहेसच. अंबरनाथ घरी”.
आणखी वाचा – Video : अशोक सराफांचा पत्नीला वाकून नमस्कार, ‘त्या’ कृतीने उपस्थितही भावुक, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव
अभिनेत्रीच्या या नव्या गाडी घेतल्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.