मुंबई आणि ट्रॅफिक हे जणू एक समीकरणच बनलं आहे. रस्त्यांची सुरु असलेली कामे व मेट्रो स्टेशनची उभारणी यांमुळे मुंबईत नेहमीच ट्रॅफिकची समस्या होते, पण पावसाळ्यात ती आणखीनच वाढते. याच ट्रॅफिकमुळे अनेकदा आपण वेळेवर नियोजित स्थळी पोहोचू शकत नाही. परिणामी आपली अनेक महत्त्वाची कामे रखडतात. असाच काहीसा त्रास प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर याला सहन करावा लागला. (abhijeet khandkekar in mumbai traffic)
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता अभिजीत खांडकेकर सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत मल्हारची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. पण प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याला नुकतंच मुंबईच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. अभिजीत गोरेगाव ते ठाणे असा प्रवास करत असताना तब्बल साडेतीन तास तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता. त्यामुळे अभिजीतने यावर संताप व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.
पाहा अभिजीत खांडकेकरची इन्स्टा स्टोरी (abhijeet khandkekar in mumbai traffic)
शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये अभिजीत ट्रॅफिकमध्ये अडकला असून ज्यात तो न्यूजपेपर वाचताना दिसत आहे. आणि कॅप्शनमध्ये म्हणाला, “साडे तीन तास traffic मध्ये and still counting… , गोरेगाव ते ठाणे घोडबंदर Rocks”. असं म्हणत अभिजीतने आपला ट्रॅफिकमधला अनुभव शेअर केला. अभिजीत सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी असून तो यानिमित्ताने दररोज गोरेगाव ते ठाणे या मार्गाने प्रवास करतो.

केवळ सर्वसामान्य नागरिक नाही, तर मनोरंजन विश्वातील कलाकारांनाही ट्रॅफिकचा त्रास होत आहे. अश्याच प्रकारचा अनुभव याआधी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला पुणे-मुंबई महामार्गादरम्यान आला होता. तर अभिनेते सागर तळाशीकर यांनी कोल्हापूर ते पुणे प्रवासादरम्यान ट्रॅफिकमुळे झालेल्या त्रासाबद्दल फेसबुकवर आपला अनुभव शेअर केले. (abhijeet khandkekar in mumbai traffic)
हे देखील वाचा : ऋषी सक्सेना व ईशा केसकर अडकणार लग्नबंधनात, साधेपणाने उरकणार लग्न, अभिनेत्री म्हणाली, “थाटामाटत लग्न करण्याची…”