अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना यांची जोडी इंडस्ट्रीतील क्युट कपल पैकी एक आहे. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. गेल्या सहा वर्षांपासून ईशा आणि ऋषी एकमेकांना डेट करत आहेत. बरं डेट सोबतच ही जोडी लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. लिव्हइन मध्ये राहत असल्यामुळे ही जोडी नेहमीच चर्चेत असलेली पाहायला मिळते. लग्न कधी करणार वा लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारून ईशा आणि ऋषी कायमच प्रश्नांना तोंड देताना दिसतात. यावरून नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा केसकर हिने भाष्य केलं आहे. (Isha kesakar and Rishi saxsena)
‘मी तिच्या आवाजाचा दिवाना होतो’ म्हणत किरण माने यांची ‘ती’च्या साठीची पोस्ट होतेय चर्चेत, किरण माने यांची पोस्ट नेमकी कोणासाठी आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
पाहा ईशाने लग्नाबाबत केलं भाष्य (Isha kesakar and Rishi saxsena)
ईशा आणि ऋषी सध्या लिव्हइन रिलेशेनशीपमध्ये राहत आहेत. बरेचदा त्यांना लग्नाबद्दल विचारण्यात येत, मात्र इतक्यात तरी लग्नाचा काही विचार नसल्याचा खुलासा अभिनेत्री ईशाने केला आहे. ईशाने आजवर अनेक मालिका तसेच सिनेमांमध्ये काम केलं आहे. या मालिकांमध्ये किंवा सिनेमात सीन दरम्यान तिचं अनेकदा लग्न झालं आहे. त्यामुळं आता पुन्हा थाटामाटात लग्न करण्याची इच्छा नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. “माझं आधीच १३ वेळा लग्न झालंय, त्यामुळं पुन्हा तसंच थाटामाटत लग्न करण्याची अजिबातच इच्छा नसल्याचं” ईशा सांगते.
हे देखील वाचा – सिनेसृष्टीमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी सई ताम्हणकरचा मोठा खुलासा म्हणाली, “पुरुषांचं यश..”

ईशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बानू’ आणि ‘शनाया’ या तिच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तर ऋषी देखील ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. इशा आणि ऋषी या दोघांनी छोटा पडदा विशेष गाजवला आहे. दोघांचेही सोशल मिडियावर फॅन फॉलोविंग आहेत. काही दिवसांपूर्वीच इशा ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने सोबत मुख्य भूमिकेत झळकली होती.