Vicky Kaushal Family : सध्या सर्वत्र हवा आहे ती म्हणजे छावाची. छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक अल्पावधीतच या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. तोंडभरून कौतुक झालेल्या या चित्रपटासाठी अनेकजण गर्दी करत आहेत. अशातच काल या बिग बजेट चित्रपटाचा प्रीमियर सोहळा अगदी दणक्यात झाला. यावेळी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असणारा अभिनेता विकी कौशल त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफसह हातात हात घालून रेड कार्पेटवर आला. विकी आणि कतरीना हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याने त्वरित रेड कार्पेटवर एंट्री घेत प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. विकी काळ्या रंगाच्या सूटमध्ये देखणा दिसत होता तर कतरिना निळ्या साडीमध्ये छान दिसत होती.
विकी आणि कतरीनाचा रेडकार्पेट लूक अनेकांच्या पसंतीस पडला, परंतु या सर्वांच्या मध्यभागी विकी कौशलची आई हिने लक्ष केंद्रित केलं. जी अगदी सध्या लूकमध्ये रेड कार्पेटवर आली होती आणि तिच्या साधेपणाने लोकांची मने जिंकली. विक्की कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशलही यावेळी रेड कार्पेटवर आला आणि त्याचे वडील शाम कौशल त्याच्या आईचा हात धरुन रेड कार्पेटवर आले. विकीचे वडील देखील अगदी साधे आले होते. त्याच्या आईच्या साधेपणाबद्दल काय बोलावं हे कळतंच नाही. दोघेही खूप गोंडस दिसत होते.
विकीच्या पालकांच्या साधेपणाने विशेषत: त्यांच्या आईने लोकांची मनं चोरली आहेत. विकीची आई गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन आली होती. त्यांना पाहून प्रत्येकजण त्यांच्या साधेपणाचं कौतुक करताना दिसला. “त्या खूप गोंडस आहेत”, “विकीची आई खूप गोंडस आणि निर्दोष आहे”, “ही खरी कमाई आहे”, अशा कंमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. विकी कौशल आणि कतरीना कैफ दोघेही एकमेकांकडे पाहत रेड कार्पेटवर एंट्री घेताना दिसले हे पापराजींनी अचूक त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.
चित्रपट पाहिल्यानंतर आता प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना हा चित्रपट आवडला असल्याचं समोर आलं आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, निलकांती पाटेकर, संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांची या चित्रपटात मांदियाळी आहे.