पंजाबी संगीत क्षेत्राततून एक धक्कादायक बातमी आली आहे. कॅनडामध्ये पंजाबी गायक प्रेम ढिल्लनच्या घरावर गोळीबार झाला आहे. असे म्हटले जाते की काही हल्लेखोरांनी गायकाच्या बंगल्यावर गोळीबार केला आणि ते पळून गेले. या घटनेनंतर, कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असताना, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी घेत, जयपाल भुल्लर टोळीने आपल्या कथित पोस्टमध्ये दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांचे नावही घेतले आहे, ज्याची २०२२ मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. (ap dhillon house firing)
गायक प्रेम ढिल्लनच्या घरावर गोळीबाराची ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबारानंतर, आरोपीने एक पोस्ट शेअर करत घटनेची जबाबदारी घेतली आणि संगीत क्षेत्रातील वर्चस्वाबद्दल लिहिलं आहे. या पोस्टमध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आणि जयपाल भुल्लर टोळीशी संबंधित असलेल्या जेंटा खरडने प्रेम ढिल्लनच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. इतकंच नाही तर तो खालिस्तानी दहशतवादी अर्श डाला याच्या संपर्कात असल्याचंही म्हटलं जात आहे.
आणखी वाचा – ‘दंगल’नंतर सान्या मल्होत्राचं उद्धवस्त झालेलं आयुष्य, अभिनेत्रीचं मोठं भाष्य, म्हणाली, “अशी अवस्था होती की…”
गायक प्रेम ढिल्लनच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी सोशल मीडिया पोस्ट पंजाबी भाषेत आहे. त्यात म्हटले आहे की, “मी ते टाळण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. सर्वप्रथम तो सिद्धू मूसेवालाबरोबर आला. त्याच्याशी करार केला आणि नंतर जग्गू भगवानपुरियाबरोबर मिळून तू सिद्धूला धमकी देऊन करार मोडला. मग त्याच्या नुकसानाकडेही बोट दाखवले. यामध्ये सिद्धूच्या मृत्यूची खिल्ली उडवली आणि सहानुभूतीसाठी एक गाणे देखील बनवले”.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, “तो सिद्धूला आपले वडील मानत असे. पण वडिलांच्या निधनानंतर, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांच्याबरोबर जाऊ लागला. आता त्याने ते गाणे आमच्या प्रतिस्पर्ध्याला (केव्ही ढिल्लन) दिले. मला पाठीत वार करण्याची सवय नाही. मी हे तुला घाबरवण्यासाठी केले. ही फक्त शेवटची चेतावणी आहे. जर तू अजूनही तुझे मार्ग सुधारले नाहीस, तर तू कुठेही पळालास तरी, माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तू कॅनडाला जा किंवा इतरत्र कुठेही जा. मी तुला मारुन दाखवणारच”.