बॉलिवूड सिनेसृष्टीपाठोपाठ आता मराठी मनोरंजन विश्वात ही कलाकारांचं ब्रेकअप हे सर्रास होताना दिसतंय. अशातच एका मराठमोळ्या जोडीमध्ये दुरावा आल्याची बातमी नुकतीच समोर आल्याने या चर्चेला उधाण आलं आहे. बर एक दोन नव्हे तर तब्बल सहा वर्ष सोबत राहिल्यानंतर या कलाकारांच्या नात्यात दुरावा आल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेता आदिश वैद्य आणि ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील अभिनेत्री रेवती लेले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.याच संदर्भांत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेवतीने यावर स्पष्ट भाष्य केल्याचं समोर आलं आहे. (Aadish and revati breakup)
नुकत्याच ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रेवतीने त्यांच्या नात्याबद्दल आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. आपल्याला आपलं वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक करायचं नसल्याचं या मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं आहे.
पाहा वेगळं होण्याबाबत रेवतीने स्पष्ट केली तिची बाजू (Aadish and revati breakup)
मराठी सिनेसृष्टीत लोकप्रिय जोडींपैकी एक असलेली रेवती आणि आदिशची जोडी वेगळी होणार असल्याच्या चर्चा ऐकून चाहत्यांमधील चर्चेला जोर आला असल्याचं समोर आलं आहे. सहा वर्ष आदिश आणि रेवती रिलेशनशिप मध्ये होते. दरम्यान रेवतीने सोशल मीडियावरून आदिशला अनफॉलो केलं असल्याचंही समोर आलं आहे, तसेच तिने आदिशसोबतचे फोटोही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे.

आदिश सोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चांवर भाष्य करत रेवतीने ईटाइम्सला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, “मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करायची नाही किंवा बोलायचे नाही. होय, काही गोष्टी घडल्या आहेत, पण मला माझे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक प्लॅटफॉर्म्सवर खासगी ठेवायचे आहे. मला याबद्दल सखोल किंवा तपशील माहिती सांगायची नाही. माध्यमांमध्ये आमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या जात आहेत, पण मला त्याबद्दल टिप्पणी करायची नाही.”
हे देखील वाचा – चाहत्याच्या पत्रामुळे विशाखा सुभेदार यांच्या समोर आलं १५ वर्षांपूर्वीच सत्य, म्हणाल्या “एक चिठ्ठी ..”
रेवती पुढे असंही म्हणाली आहे की, “सध्या मी खूप आनंदी आहे. माझं कुटुंब आणि मित्र मला आधार देत आहेत.” दरम्यान रेवतीने दिलेल्या या वक्तव्यांमुळे त्यांच्या ब्रेकअपवर तिने शिक्कामोर्तब केला असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.