Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी सैफच्या घरी क्राईम सीन पुन्हा तयार केला. सैफवर ज्या चाकूने हल्ला केला होता त्याचा तिसरा तुकडाही पोलिसांनी जप्त केला आहे. आता या प्रकरणात एक मोठा अपडेट आला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली दिल्याची पोलिस सूत्रांकडून मोठी माहिती मिळाली आहे. काहीही झाले तरी आरोपीच्या कबुलीला खूप महत्त्व असते.
मोहम्मद शरीफुल शहजादच्या वडिलांचे नाव मोहम्मद रुहुल अमीन आहे. मोहम्मद रुहुल अमीन यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांचे मुलाशी बोलणे झाले होते. मोहम्मद रुहुल अमीन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कोणताही कागदपत्र घेऊन भारतात आला नव्हता. मोहम्मद शरीफुल शहजाद हा दुचाकीस्वार म्हणून काम करायचा. तो कधीही कुस्ती खेळला नाही.

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम हा बांगलादेशचा असल्याचे पुरावे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपींकडून बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रेही जप्त केली आहेत. १५ जानेवारीला मध्यरात्री आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसले होते. तो चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला होता. आरोपींची सैफ अली खानबरोबर बाचाबाची झाली. यावेळी सैफ अली खान जखमी झाला. सैफ अली खानवर सहा वेळा वार करण्यात आला आणि हल्ला करुन आरोपी पळून गेला.
यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या पाठीच्या कण्याजवळ चाकू घुसला होता. मात्र, आता सैफ अली खान बरा आहे. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या अभिनेत्या त्याच्या कुटुंबासह घरी आहे.