Hina Khan On Marriage : टेलिव्हिजनमधील लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हिना खान. अभिनेत्री सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्री तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त आहे. या काळातही ती सतत काम करताना दिसतेय. केमोथेरपीपासून ते हॉस्पिटलमध्ये येण्यापर्यंतचे सर्व अपडेट्स तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिले आहेत. अशातच आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा दीर्घकाळचा प्रियकर रॉकी जैस्वालबरोबर स्पॉट झाली आहे. त्यांना एकत्र पाहून अनेकांनी दोघांना लग्नाचा सल्ला दिला आहे.
हिना खान काल रात्री मुंबईतील एका ठिकाणी स्पॉट झाली होती. यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात टिपलं. यावेळी रॉकीही तिच्याबरोबर होता. त्याने अभिनेत्रीसह अनेक पोजही दिली. यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, “आम्ही एकत्रच राहतो फक्त आम्ही बाहेर पडत नाही”. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पापाराजी दोघांचे एकत्र फोटो काढताना दिसत आहेत आणि नंतर एकट्याने ते फोटो काढत आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
यावेळी हिना खानने को-ऑर्ड सेट घातला होता आणि रॉकी स्वेटशर्ट आणि डेनिममध्ये होता. हे जोडपे सुंदर दिसत होते पण काही लोकांना त्यांचं एकत्र असणं आवडलं नाही. यावर धर्माचे ठेकेदार आपापले मत मांडताना दिसले. एका यूजरने लिहिले की, “कॅन्सर झाल्यानंतरही तिचे मन हरवले नाही आणि ती तिच्या हिंदू बॉयफ्रेंडबरोबर फिरत आहे”. तर एकाने लिहिले की, “इतर कोणीही हे शोधू शकले नाही”. एकजण म्हणाला, “लग्न करायला काय हरकत आहे?”. तर एकाने लिहिले, “कृपया लग्न करा, तुमचे नाते खासगी ठेवा”.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम अभिनेत्याची लगीनघाई, नुकताच पार पडला साखपुडा, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक
हिना खाननेही काही दिवसांपूर्वी रॉकीबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. त्याचवेळी, त्याने काही मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तिच्या आजारपणात, तिच्या स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त तिला रॉकी आणि त्याच्या कुटुंबाकडून खूप पाठिंबा आणि प्रेम मिळाले आहे. रॉकी तिची खूप काळजी घेत आहे.