बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आजवर अक्षय अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसला आहे. त्याच्या सगळ्याच भूमिकांना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. नुकताच तो ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसून आला होता. आता पुन्हा एकदा तो नव्या अवतारात बघायला मिळत आहे. या वर्षी त्याचा एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कन्नपा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा अक्षयचा पहिला दाक्षिणात्य चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी विष्णु मांचू यांच्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अक्षय शिव शंकराच्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांच्या खूप पसंतीस पडत आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. (akshay kumar new movie poster)
अक्षय हिंदी चित्रपट ‘ओह माय गॉड’च्या पहिल्या व दुसऱ्या भागात कृष्ण व भगवान शंकराची भूमिका साकारताना दिसला होता. त्याच्या या भूमिकांना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. आता तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. ‘कन्नप्पा’ या चित्रपटामध्ये तो भगवान शंकराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत लिहिले की, “कन्नप्पा साठी महादेवाचे पवित्र रुप घेऊन पाऊल ठेवत आहे. या महाकाव्याचा एक भाग झाल्याने खूप सन्मान मिळत आहे. भगवान शंकर आम्हाला मार्गदर्शन करतील. ओम नम: शिवाय”.
‘कन्नप्पा’मुळे लोकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. भगवान शंकराचे भक्त कन्नप्पा यांच्या गोष्टीवर आधारित आहे. तसेच अक्षय कुमारबरोबर यामध्ये प्रभास नंदीच्या रुपात व मोहनलाल यांची विशेष उपस्थिती दिसून येणार आहे. तसेच अभिनेत्री काजल अग्रवाल देवी पार्वतीच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट मोठी कलाकृती असण्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटामुळे भारतीय चित्रपट संस्कृतीचे दर्शन दर्शकांना होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात प्रिती मुकुंदन, मोहन बाबू, आर सरथकुमार, ब्रह्मानंदम, मधु व मुकेश ऋषी हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये पाहता येणार आहे.