Shivani Sonar Ambar Ganpule Wedding : सध्या सोशल मीडियावर एका कलाकार जोडीच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. कलाविश्वात लगीनघाई सुरु असून एक मराठमोळी कलाकार जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे मालिकाविश्वातील दोन लोकप्रिय चेहरे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बरेच दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. इतकंच नव्हे तर त्यांची लगीनघाईही पाहायला मिळाली. अखेर आता शिवानी व अंबर यांचे लग्नाआधीचे खास सोहळे संपन्न होताना दिसत आहेत. याचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
शिवानी व अंबर यांच्या संगीत सोहळ्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या संगीत सोहळ्यामध्ये शिवानी व अंबर यांनी तुफान डान्स केलेला पाहायला मिळाला. दोघांच्या डान्स मूव्हने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्याचा मित्र परिवार, कुटुंबीय, नातेवाईकही या संगीत सोहळ्यात धमाल, मस्ती करताना दिसले. या संगीत सोहळ्यासाठी शिवानीने खास वेस्टर्न डिझाइनर ड्रेस परिधान केला होता, तर अंबरही सुटाबुटात डॅशिंग अंदाजात दिसला.
शिवानी व अंबर यांच्या संगीत सोहळ्यानंतर आता साऱ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत. अंबरच्या हळदी संभारंभाच्या फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तर शिवानीच्या मेहंदीच्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळीही अंबर व शिवानीने डान्स केलेला पाहायला मिळाला. शिवानी व अंबर यांनी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’चा विजेता ठरला करणवीर मेहरा, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात शिवानी व अंबर यांनी साखरपुडा करुन सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. त्यांच्या बॅचेलर पार्टीचे फोटोही चर्चेत आले, शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवाराने केलेले केळवणही खास ठरले. रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांनी या दोघांसाठी खास केळवणाचा बेत केला होता. ‘राजा रानीची गं जोडी’, ‘सिंधूताई माझी माई’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर अंबर ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचला.