‘बिग बॉस मराठी सिझन ४’ रंगतदार झाला तो अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या केमिस्ट्रीमुळे. बऱ्याच दिवसांपासून अमृता आणि प्रसादच्या अफेअरची चर्चा रंगली होती असं असलं तरी त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत बातमी काही दिली नव्हती. त्यानंतर आता थेट साखरपुडा उरकल्याचे फोटो शेअर करत प्रसाद आणि अमृता यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. या दरम्यान त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली. (Prasad amruta photoshoot)
प्रसाद आणि अमृता यांनी धुमधडाक्यात साखरपुडा सोहळा न करता कुटुंबियांच्या समवेत त्यांनी हा सोहळा उरकला. याचे काही तुरळक फोटो सोशल मीडियावर वायरलही झाले होते. त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंची क्रेज जशी आहे तशीच त्यांच्या नव्या फोटोशूटचीही आहे. प्रसाद आणि अमृता यांनी नवं फोटोशूट केलं आहे. रोमँटिक अंदाजात केलेल्या या प्रसाद अमृताच्या फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पाहा चाहत्यांनी काय म्हटलंय प्रसाद अमृताच्या या फोटोशूटवर (Prasad amruta photoshoot)
मॉडर्न आऊटफिटमध्ये शूट करण्यात आलेल्या प्रसाद आणि अमृताच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अमृता आणि प्रसादने हे त्यांचे रोमँटिक फोटोस सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर प्रेक्षकांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. प्रसाद अमृताचं हे फोटोशूट त्यांना आवडलं असल्याचं चाहत्यांनी कमेंटमधून सांगितलं आहे.(prasad amruta romantic photoshoot)
हे देखील वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर बिबट्या शिरल्याने उडाली तारांबळ
प्रसाद आणि अमृता यांनी पोस्ट केलेले फोटो पाहून एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, ‘में जोरू का गुलाम बन के रहुंगा’, असं म्हणत प्रसादला डिवचलं आहे. प्रसाद आणि अमृता यांनी याआधीही बरेच फोटोस आणि रील्स एकत्र शेअर केले आहेत. आता चाहत्यांना प्रसाद आणि अमृताच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
