मालिकांचं शूट हे दैनंदिन तत्वावर सुरु असत.बऱ्यचशा मालिकांचे सेट हे फिल्मसिटी मध्ये आहेत.यातच एक घटना समोर आली आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. या मालिकेचे गोरेगाव फिल्मसिटी मध्ये शूट सुरु असताना सेटवर बिबट्याचे बछडे आत शिरल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भांतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. अचानक बिबट्या आत शिरल्याने सेटवर लोकांची एकच तारांबळ उडल्याची पाहायला मिळते आहे. (leopard spotted on set of marathi tv serial)
पाहा नेमकं काय घडलं? (leopard spotted on set of marathi tv serial)
गोरेगाव फिल्मसिटी मध्ये अनेक सेट आहेत. मोठ्या प्रमाणावर जनमानसाचा वावर या ठिकाणी दररोज असतो, त्यावेळी सेटवर २०० हुन अधिक लोक तिथे उपस्थिती होती.या घटनेमुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.मागील 10 दिवसांमध्ये असा प्रकार तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा घडला आहे. काही दिवसांपूर्वी बालकलाकार मायरा वैकुल हिच्या ‘नीरजा’ या हिंदी मालिकेच्या सेटवर देखील बिबट्या शिरला होता. सरकारने यासंदर्भात काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे,” असं या घटनेनंतर ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश श्यामल गुप्ता यांनी म्हटलं आहे.
या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असूनही त्याकडे सरकार फार काळजीपूर्वक लक्ष देताना दिसत नसल्याची खंतही गुप्ता यांनी व्यक्त केली. “सरकारने तातडीने सुरक्षेसंदर्भातील पावलं उचलली नाहीत तर फिल्म सिटीमधील हजारो कर्मचारी आणि कलाकार संपावर जातील,” असा इशारा गुप्ता यांनी दिला आहे. सरकारने याबाबत ठोस पावलं उचलणं महत्वाचं आहे.
कोणत्याही व्यक्तीची सुरक्षा ही फार महत्वाची आहे. कलाकार तसेच एखाद्या प्रोजेक्टची संपूर्ण टीम सेटवर असते. दैनंदिन कामाच्या ठिकाणी जीवावरचा धोका पेलत सामान्य माणसासाठी, काम करत राहणं कठीण आहे.(sukh mhnaje nkki kay asat)
हे देखील वाचा : अवधूत गुप्तेंच्या घरात माकडाने घातला धुमाकूळ, व्हिडिओ होतोय वायरल
