बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करने आजवर आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक हिंदी-पंजाबी गाण्यांना तिचा आवाज लाभला असून तिच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. आपल्या गायनाने व सुमधुर आवाजाने चर्चेत राहणारी नेहा कक्कर सध्या एका घोटाळ्याच्या अफवांमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेहाला अटक करण्यात आली आहे. गायिकेला ट्रेडिंग घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचा दावा या व्हायरल फोटोंमधून केला जात आहे. नेहाला या घोटाळ्यात अटक झाल्याची अफवा समोर आल्यानंतर सिनेविश्वासह तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (neha kakkar arrested for scam)
नेहाचे हे फोटो एका लिंकसह व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये नेहाच्या नावाने ‘एमारल्डो’ची जाहिरात करणारी बनावट मुलाखत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये नेहा रडतेय आणि एक पोलीस इन्स्पेक्टर तिला खेचून नेताना दिसत आहे. या फोटोसह असेही म्हटले जातेय की, यानंचर नेहाची कारकीर्द संपणार आहे. पण हा व्हायरल फोटो खरा नसून खोटा आहे. नेहाचे हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आले असावेत आणि तिचा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही. नेहाचा हा फोटो बनावट असून एआय किंवा फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘पाताल लोक’ सीरिज फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
AI चा वापर करुन अनेकदा सेलिब्रिटींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी अमिताभ बच्चन,रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींची नावेही समोर आलेली, गुंतवणूक स्कॅम करणाऱ्या वेबसाइट्सकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी अशाप्रकारचे बड्या सेलिब्रिटींची नावे वापरली जातात. अशाच प्रकारे आता गायिका नेहा कक्करच्या फोटोचा वापर करण्यात आला आहे.
आणखी वाचा – आई नाही पण मालिकेतील कलाकारांनीच थाटामाटात केलं डोहाळे जेवण ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीला अश्रू अनावर
दरम्यान, सुरुवातीला बघताच क्षणी नेहाबद्दल खरी वाटणारी ही गोष्ट मात्र पूर्णपणे खोटी आहे. या फोटोला कोणतेच तथ्य नाही. नेहाच्या या अटकेच्या व्हायरल फोटोमागचे सत्य असे आहे की, त्यात दिसणारी महिला दुसरी कोणीतरी आहे आणि नेहाचा चेहरा त्यावर मॉर्फ करण्यात आला आहे. एआय किंवा फोटोशॉपच्या मदतीने असे करता येणे सहज शक्य आहे.