‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ अशा दर्जेदार चित्रपटांमधून हटके लव्हस्टोरीज् जगासमोर आणणारे दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे. सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही प्रेमकहाणी ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये होती. फारसे ताणतणाव, वळणे, धक्के, भावनिक अत्याचार काहीही नसलेली ही ‘प्रेमाची गोष्ट’ प्रेक्षकांना भावली होती. त्याच प्रेक्षकांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे चित्रपटाचे निर्माते या गाजलेल्या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. (premachi goshta 2 movie announced)
प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल. ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाविन्य म्हणजे यात व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. यामध्ये अविनाश नारकर, प्रसाद बर्वे, रेश्मा रामपूर, रमाकांत दायमा, राजेश मापुस्कर, पूजा वानखेडे व करण परब हे कलाकार असणार आहेत.
आणखी वाचा – सई, प्रसाद, समीर, ईशा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, ‘गुलकंद’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जुगलबंदी होणार
सोशल मीडियावर या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका जुन्या ९०च्या लोकप्रिय गाण्याने या व्हिडीओची सुरुवात होते. मग पुढे सतीश यांच्या सर्व चित्रपटांची नावे समोर येतात आणि अखेर एका दरवाज्यामागून ‘प्रेमाची गोष्ट २’ हे नाव समोर येते. “प्रेमाचा Effect असणारी मनातली स्पेशल गोष्ट. येत्या जून मध्ये घेऊन येत आहोत” असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसंच ‘प्रेमाची गोष्ट २’ या शीर्षकाखाली “होऊ दे तुझ्या मनासारखं” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – “तिनेच दारुची सवय लावली”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर धक्कादायक आरोप, काळं सत्य
दरम्यान, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे यांच्या प्रेमाची गोष्ट’ने प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता या चित्रपटाचा भाग २ प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यामुळे अनेकजा याची वाट पाहत आहेत हे नक्की…