मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या विविध फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर, ज्या वयाची पन्नाशी ओलांडूनही त्यांचे सौंदर्य एखाद्या विशीतल्या मुलीसारख्या दिसतात. याचे कारण, म्हणजे ऐश्वर्या आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. (aishwarya narkar)
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत खलनायिकेची भूमिका करणाऱ्या ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असून त्या त्यांचे फोटोशूट्स, वर्कआऊट व्हिडिओसोबत आपल्या डान्सचे व्हिडिओसही शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओसचे चाहते कौतुक करतात, मात्र काहीवेळा त्या ट्रोलिंगच्या शिकारही होतात. असं असूनही त्यांनी अनेकदा ट्रोलर्सना प्रतिउत्तर दिलेलं आहे. आता ऐश्वर्या यांना अश्याच एका ट्रोलिंगला सामोरे गेल्या, मात्र त्यांनी त्या ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. (aishwarya narkar reply to troller)
पहा काय उत्तर दिलं ऐश्वर्या यांनी ट्रोलरला (aishwarya narkar reply to troller)
ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात त्या कोळीनृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओ सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्या म्हणतात, “Remembering school days ♥️???? #kolidance with this amazing friend of mine..”. त्यांच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करून लिहिलंय, “छान संस्कृती आहे madam नवरा दुसऱ्या मुलींसोबत नाचतो आणि तुम्ही दुसऱ्या मुलांसोबत नाचता विदेशी संस्कृती च अंधानुकरण म्हणतात याला”. त्यावर ऐश्वर्या यांनी “???????? तुमच्या बुध्यांकाचं काय बरं करावं?!?” असं प्रतिउत्तर देतात. दोघांमधील प्रत्युत्तरानंतर शेवटी ऐश्वर्या म्हणतात, “कळण्यापलिकडचं आहे.. जाऊदे…????♥️????”
ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक मालिका, सिनेमे व नाटक केले असून सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. त्यांचे पती अविनाश नरकारही प्रसिद्ध अभिनेते असून तेदेखील मनोरंजनसृष्टीत ऍक्टिव्ह आहे. (aishwarya narkar reply to troller)

हे देखील वाचा : ईशा व अनिशचं पळून जाऊन लग्न, देशमुख-केळकरांच्या घरात येणार वादळ